पुन्हा दिसला Vijay Sethupathi चा साधेपणा, Merry Christmas च्या इव्हेंटमध्ये चप्पल घालून पोहचला अभिनेता

Vijay Sethupati Simple Look: नुकताच 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाच्या दिग्दर्शनकांनी आयोजित केलेल्या प्रेस कॉन्फरन्सला या दोन्ही कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी विजय सेतुपतीच्या लूकने सर्वांची मनं जिंकली.
Vijay Sethupathi Look
Vijay Sethupathi LookSaam Tv
Published On

Katrina Kaif And Vijay Sethupati Movie:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Kaitrina Kaif) आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता पहिलं गाणं 'नजर तेरी तुफान' प्रेक्षकांच्या भेटीला आले. याला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली. कतरिना आणि विजय दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहेत. नुकताच या चित्रपटाच्या दिग्दर्शनकांनी आयोजित केलेल्या प्रेस कॉन्फरन्सला या दोन्ही कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी विजय सेतुपतीच्या लूकने सर्वांची मनं जिंकली.

'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी कतरिना कैफ रेड कलरचा वनपीस ड्रेस परिधान करून पोहोचली. तिच्या लूककडेच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिचे या स्टायलिश लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कतरिनाने साधा रेड कलरचा फिटिंग वनपीस ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने केस मोकळे सोडले होते आणि हिल्स कॅरी केल्या होत्या. लाईट मेकअपमध्ये कतरिना कमालच दिसत होती. अभिनेत्रीसह चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट यावेळी उपस्थित होती. यामध्ये विजय सेतुपतीच्या लूकने देखील सर्वांचे लक्ष वेधले.

Vijay Sethupati Simple Look
Vijay Sethupati Simple LookSocial media

'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात कतरिनासोबत साऊथ अभिनेता विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे. विजयने या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेल्या ड्रेसिंगने सर्वांचे मन जिंकले. अतिशय साध्या लूकमध्ये आणि चप्पल घालून विजय सेतुपती प्रेस कॉन्फरन्सला पोहचला होता. यावेळी विजय सेतुपतीने ब्लॅक कलरच्या जीन्ससह ग्रे कलरचा शर्ट परिधान केला होता. तसंच त्याने पायामध्ये चप्पल घातली होती. अभिनेत्याचा हा साधेपणा प्रत्येकाला प्रचंड आवडला. सध्या या लूकमधील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vijay Sethupathi Look
Delivery Boy Teaser: हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परबच्या 'डिलिव्हरी बॉय'चा धमाकेदार टीझर रिलीज

तर या चित्रपटातील अभिनेता संजय कपूर डेनिम जीन्ससह ब्ल्यू कलरचा कोट आणि व्हाइट शर्ट परिधान केलेला दिसला. यावेळी संजय कपूर खूपच हँडसम दिसत होता. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन देखील स्टारकास्टसोबत फोटो क्लिक केले. श्रीराम राघवन यांनी यापूर्वी 'अंधाधुन', 'बदलापूर', 'एजंट विनोद' आणि 'एक हसीना थी' या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट 19 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Vijay Sethupathi Look
या वयात काय सिद्ध करायचंय..., मराठमोळी अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे ट्रोल; नेटकऱ्यांनी दिले मराठी संस्कृतीचे धडे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com