Latest Bollywood News: बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानला नुकतीच धमकी आली आहे. मागील अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अशातच आता सलमान खाननंतर शाहरूख खानला धमकी आल्याने इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. शाहरूख खानला धमकी आल्यानंतर वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरूख खानला खंडणीसाठी धमकी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा तपास आता पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख खानला धमकीचा फोन रायपूरमधून आला होता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. फैजान नावाच्या व्यक्तीने हा फोन केला होता. यानुसार मुंबई पोलिसांचे पथक रायपूर येथे रवाना झाले आहे. शाहरूख खानला धमकी नेमकी का आली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सलमाननंतर शाहरूख खानला धमकीचा फोन आला आहे. शाहरूख खानला धमकी मिळाली असून, त्यात कोट्यवधी रूपये द्या नाही दिले तर जीवे मारून टाकू असं म्हटलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नुकतंच शाहरूख खानने त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी शाहरूख खान वाढदिवसला 'मन्नत' या त्यांच्या बंगल्याबाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतो. मात्र यंदा शाहरूख खानने तसे केले नाही.