Randeep Hooda Gets Serious Injury: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. सावरकर हा चित्रपटामध्ये तो दिसणार आहे. दरम्यान अभिनेता हॉर्स रिडींग करताना बेशुद्ध होऊन घोड्यावरून खाली पडल्याची बातमी समोर आली आहे. रणदीपला गंभीर दुखापत झाली आहे. रणदीपला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. रणदीप सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेड रेस्ट घेत आहे.
रणदीप हुड्डा यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. रणदीपला रुग्णालयात दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी मार्च 2022 मध्ये त्यांनी हॉस्पिटलमधील स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याचेही सांगितले होते. 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेबसीरीजच्या सेटवर रणदीपसोबत हा अपघात घडला होता. या अपघातात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तेव्हा तो एका अॅक्शन सीनचे शूटिंग करत होता, जखमी झाल्यानंतर सुद्धा त्याने शूटिंग थांबू दिले नव्हते, असे सांगितले जात आहे.
सलमान खानच्या 'राधे' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देखील रणदीप हुड्डाला गंभीर दुखापत झाली होती. अॅक्शन शूट करताना त्याला दुखापत झाली होती.
प्रोफेशन लाईफसह रणदीप त्याच्या पर्सनल लाईफमुले देखील चर्चेत असतो. अभिनेत्री लिन लैशरामबरोबरच फोटो पोस्ट करत त्याने दोघे डेट करत असल्याचे जाहीर केले होते. रणदीपच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो 'कॅट' या नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल वेबसीरीजमध्ये दिसला होता. सद्य तो 'सावरकर' चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटासाठी त्याने २२ किलो वजन कमी केले होते. या चित्रपटाचे पोस्ट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.