बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. सध्या अभिनेता सोशल मीडियावर चित्रपटामुळे नाही तर, एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ख्रिसमस सेलिब्रेशन वेळी रणबीर कपूरने केकवर दारु ओतून त्याला आग लावत कापतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता केक कापताना 'जय माता दी'चा जयघोष करताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रणबीर कपूर या कृत्यामुळे अडचणीत आला आहे. व्हिडीओवरून अभिनेत्याला ट्रोल केलं जात असून त्याच्याविरोधात आता मुंबईमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रणबीरचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन पेजने शेअर केला असून व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर मुंबईतील एका व्यक्तीने रणबीरविरोधात तक्रार दाखल केली. घाटकोपर पोलिस ठाण्यामध्ये संजय तिवारी नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. घाटकोपर पोलिसांनी संजय तिवारी यांची रणबीर कपूरविरोधातील तक्रार नोंदवून घेतली आहे. आता पोलिस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सजंय तिवारी यांनी तक्रारीमध्ये नमुद केले आहे की, ख्रिसमस सेलिब्रेशनदरम्यान रणबीरने केकवर दारु ओतत 'जय माता दी'ची घोषणा देत केक कापला. त्याच्या या कृत्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.' संजय तिवारी यांनी वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत घाटकोपर पोलिस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदाराने रणबीरविरोधात कलम २९५, २९८, ५०० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, रणबीर कपूरने २५ डिसेंबरला पत्नी आलिया भट्ट आणि मित्र परिवारासोबत ख्रिसमस पार्टी केली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रणबीर कपूरच्या ख्रिसमस पार्टीला आयान मुखर्जी, नव्या नंदा, अगस्त्य नंदा, निखिल नंदा, करिश्मा कपूर, तिची मुलं समायरा आणि कियान, रणधीर कपूर, रीमा जैन, नीला देवी, बबिता कपूर यांच्यासह कपूर घराण्यातील व्यक्ती आणि त्याचे फ्रेंड्स देखील हजर होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.