प्रभासचा बहुप्रतिक्षित ‘सालार’ २२ डिसेंबरला रिलीज झाला. प्रदर्शना आधीपासूनच चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होती. चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. लवकरच चित्रपट बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा गाठणार आहे तर, जगभरामध्ये चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांना प्रभासची आणि पृथ्वीराज सुकुमारनची जोडी फारच भावली आहे. दिवसेंदिवस चित्रपटाची क्रेझ वाढताना दिसत आहे. चला तर जाणून घेऊया, सहा दिवसाच्या कमाईबद्दल...
प्रभास, श्रुती हासन स्टारर 'सालार' चित्रपट तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड बनवताना दिसतोय. चित्रपटाने केवळ सुरुवातीच्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवरच वर्चस्व गाजवले नाही तर ख्रिसमसच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा करून घेतला. या ॲक्शन क्राईम थ्रिलरला फर्स्ट विकमध्ये प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमार यांच्या या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'डंकी'ला टक्कर देत मागे टाकले आहे. हा चित्रपट प्रत्येक दिवसाला कोट्यवधींची कमाई करत आहे.
सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ११२ कोटी, दुसऱ्या दिवशी ५६. ३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ६१ कोटी, चौथ्या दिवशी ४२. ५० कोटी, पाचव्या दिवशी २४.९ कोटी तर, सहाव्या दिवशी १७ कोटींचा टप्पा गाठला आहे. एका आठवड्यामध्ये चित्रपटाने एकूण २९७. ४० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने एका आठवड्यामध्ये ५०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचा हा उतरता आलेख पाहता १००० कोटींच्या क्लबमध्ये तरी हा चित्रपट एन्ट्री करतो का नाही? याची सर्वत्र चर्चा होते. (Bollywood Film)
'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली २: द कन्क्लूजन'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासचे इतर चित्रपट फ्लॉप ठरले. प्रभासने 'सालार'च्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त कमबॅक केले आहे. या चित्रपटाने शाहरूख खानच्या डंकीला देखील जबरदस्त टक्कर दिली आहे. सालारने रिलीजच्या एका आठवड्यामध्ये ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन ही स्टारकास्ट दिसणार आहे. या व्यतिरिक्त श्रृती हासन, बॉबी सिम्हा आणि जगपती बाबू हे कलाकारही दिसणार आहेत. (Actor)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.