मेहबूब खान यांच्या मदर इंडिया या चित्रपटात सुनील दत्तच्या बिरजूची बालपणीची भूमिका साकारणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले आहे. या अभिनेत्याने 'माया' आणि 'द सिंगिंग फिलिपिना' सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही काम केलं होतं. कर्करोगामुळे वयाच्या ७० व्या त्यांचं निधन झालं.
साजिद खान यांचा एकुलता एक मुलगा समीर याने पीटीआयला सांगितले की, ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. 22 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. समीरने सांगितले की, त्याचे वडील दुसऱ्या पत्नीसोबत केरळमध्ये राहत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याने सांगितले, माझ्या वडिलांना राजकुमार पितांबर राणा आणि सुनीता पितांबर यांनी दत्तक घेतले होते. त्यांचे पालनपोषण चित्रपट निर्माता मेहबूब खान यांनी केले होते. ते काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहून लोकांच्या कल्याणासाठी काम करत होते. ते अनेकदा केरळला जायचे आणि नंतर तिथेच ते लग्न करून स्थायी झाले. (Latest Marathi News)
त्यांच्या मुलाने पुढे माहिती दिली की, साजिद खान यांना केरळमधील अलप्पुझा येथील कायमकुलम टाऊन जुमा मशिदीत दफन करण्यात आले. दर्म्य, मदर इंडियाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. मेहबूब खानच्या 'सन ऑफ इंडिया'मध्ये साजिद खान यांनी मुख्य भूमिका साकारली होती. अमेरिकन टीव्ही शो 'द बिग व्हॅली'च्या एका एपिसोडमध्ये ते पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय 'इट्स हॅपनिंग' या म्युझिक शोमध्ये ते गेस्ट जज म्हणून दिसले होते.
साजिद खान फिलिपिन्स देशातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अभिनेत्री नोरा औनोरसोबत 'द सिंगिंग फिलिपिना', 'माय फनी गर्ल' आणि 'द प्रिन्स अँड आय' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मर्चंट-आयव्हरी प्रोडक्शन 'हीट अँड डस्ट'मध्येही त्यांनी एका डाकूची भूमिका साकारली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.