Karthik Aaryan Felicitated At IIFM 2023: कार्तिक आर्यनची किर्ती सातामुद्रापार, मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार सन्मान; कारणही आहे खास

Karthik Aaryan News: कार्तिक आर्यनच्या अभिनयाचा सन्मान जागतिक पातळीवर करण्यात येणार आहे.
Karthik Aaryan Felicitated At IIFM 2023
Karthik Aaryan Felicitated At IIFM 2023Saam Tv
Published On: 

Kartik Aaryan Honoured With Rising Global Superstar of Indian Cinema Award

‘भूल भुल्लैया २’ ‘सत्यप्रेम की कथा’ या दोन चित्रपटांमुळे सर्वाधिक प्रकाशझोतात आलेला कार्तिक आर्यन सध्या बराच चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणाचाही पाठिंबा नसताना, कार्तिकने आपली स्वतःची प्रतिमा तयार केली. बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयाचा अनेकदा सन्मान झाल्यानंतर लवकरच त्याच्या अभिनयाचे कौतुक आता जागतिक पातळीवर होणार आहे. लवकरच कार्तिक आर्यनच्या अभिनयाचा सन्मान जागतिक पातळीवर करण्यात येणार आहे.

Karthik Aaryan Felicitated At IIFM 2023
Vijay Sethupathi Jawaan Look: ‘मौत के सौदागर’ जवानमधल्या व्हिलनचा थक्क करणारा लूक आला समोर; शाहरुख विरुद्ध सेथुपती सामना रंगणार

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला जागतिक पातळीवर ‘रायझिंग ग्लोबल सुपरस्टार ऑफ इंडियन सिनेमा’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अभिनेत्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कार्तिक आर्यनचा येत्या ११ ऑगस्ट रोजी व्हिक्टोरिया सरकारकडून होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराने त्याला सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार फिल्म इंडस्ट्रीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

कार्तिकने एका निवेदनाच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत, प्रतिक्रिया दिली, “मी सर्वात आधी मेलबर्न सरकारचे खूप आभार मानतो. मेलबर्नच्या १४ व्या भारतीय चित्रपट महोत्सवात मला सहभागी करून घेतलं ही माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब आहे. माझा भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी पुरस्कार मिळतोय या करिता मला खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.”

Karthik Aaryan Felicitated At IIFM 2023
Sharad Ponkshe Video : मालिकेचे नुकसान होऊ नये... म्हणत शरद पोंक्षेंची ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून एक्झिट

Indian Film Festival of Melbourne या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन व्हिक्टोरिया सरकारकडून करण्यात येणार असून हा सोहळा ११ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे. या फेस्टीव्हलमध्ये प्रेक्षकांसाठी भारतीय चित्रपटाकरीता आणि संस्कृतीकरिता उत्सव असणार आहे. यावेळी फेस्टिव्हलमध्ये २० भाषांमध्ये एकूण १०० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावेळी ‘भूल भुलैया २’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ हे चित्रपटही या महोत्सवात दाखवले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com