आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता कार्तिक आर्यनचा आज वाढदिवस. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. कार्तिक आर्यन आज त्याचा ३३वा वाढदिवस साजरा करतोय.
मध्य प्रदेशच्या एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या कार्तिकची बॉलिवूडमध्ये कोणतीही ओळख नसताना त्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. कार्तिक आर्यनच्या कुटुंबीयांना त्याला अभिनय क्षेत्रात पाठवायचे नव्हते. कार्तिकने इंजिनियर व्हावे, अशी इच्छा त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कार्तिक आर्यनच्या कुटुंबीयांनी त्याला इंजिनियरिंगसाठी मुंबईला पाठवले होते. पण त्याला अभ्यासात फारशी आवड नव्हती. अभिनयाचे खूप वेड असल्यामुळे कार्तिकने शिक्षणासोबतच स्टुडिओमध्ये अभिनयाला सुरुवात केली. २०११ मध्ये कार्तिकला 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर त्याचे नशीबच पालटले. रोमँटिक हिरो म्हणून कार्तिक आर्यनच्या करिअरला सुरुवात झाली. तो कायमच आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखला जातो.
कार्तिक आर्यनने गेल्या काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. “माझी आई माझे सर्व पैसे सांभाळते. माझ्या बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत, याबद्दलची माहिती माझ्यापेक्षा माझ्या आईलाच माहित असते. मी जरीही आज कोट्यवधी पैसे कमवत असलो तरी मी माझ्या आईकडूनच अजूनही पॉकेटमनी घेतो. जर कधी मला कोणती गोष्ट खरेदी करायची असेल तर मी आधी माझ्या आईची परवानगी घेतो, आणि मगच ती वस्तू खरेदी करतो.” असं त्याने आपल्या मुलाखतीत सांगितले. (Bollywood Film)
कार्तिक आर्यनचे खरं नाव कार्तिक तिवारी आहे. त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच स्वत:चे नाव कार्तिक तिवारी ऐवजी कार्तिक आर्यन वापरायचा. कार्तिक एका चित्रपटासाठी जवळपास ९ ते १० कोटी रुपये इतके मानधन घेतो. अभिनेत्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. तो चित्रपटासह जाहिरातींमधूनही खूपच पैसा कमावतो. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.