IOCL Recruitment 2023: इंडियन ऑइलमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, इच्छुक उमेदवारांनी तात्काळ असा करा अर्ज

Job News: इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज (IOCL Recruitment 2023) करायचा आहे त्यांनी वेळ न घालवता तात्काळ अर्ज करावा.
IOCL Recruitment 2023
IOCL Recruitment 2023Saam tv
Published On

Job Search: नोकरीच्या शोधामध्ये (Job Search) असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयओसीएल (IOCL) म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केला आहे. ४०० पेक्षा अधिक रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज (IOCL Recruitment 2023) करायचा आहे त्यांनी वेळ न घालवता तात्काळ अर्ज करावा.

IOCL Recruitment 2023
Chandrayaan-3 Explainer: चांद्रयान, विक्रम, प्रज्ञान नावांचा संस्कृत भाषेशी संबंध काय?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, आयओसीएलमध्ये ४९० अप्रेंटिस पदाच्या जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तर १० सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अप्रेंटिसची पदं भरली जाणार आहेत.

महत्वाच्या तारखा -

अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे

अर्ज करण्याची अंतिम तारीख - १० सप्टेंबर २०२३

IOCL Recruitment 2023
Raksha Bandhan 2023 Muhurat: रक्षाबंधनाचा मुहूर्त नेमका कधी?; रामजन्मभूमीचे आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली महत्वाची माहिती

वयोमर्यादा -

या पदांठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १९ ते २४ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील -

या भरती प्रक्रियेअंतर्गत टेक्निशिअन, ट्रेड अप्रेंटिस, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, ग्रॅज्युएट या विभागांमध्ये अप्रेंटीस पदाची भरती केली आहेत.

नोकरीचे ठिकाण -

या भरती प्रक्रियेअंतर्गत भारतातील तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये उमेदवारांना कामासाठी पाठवण्यात येणार आहे.

IOCL Recruitment 2023
LPG Cylinder Price Cut: मोदी सरकारची 'रक्षाबंधन' भेट! गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार

शैक्षणिक पात्रता -

अप्रेंटीस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही त्या-त्या पदानुसार असणार आहे. तसंच, उमेदवारांना संबधित क्षेत्रातील २ वर्षांचा आयटीआय करणे आवश्यक आहे. तर काही पदांसाठी इंजिनियरिंग डिप्लोमा आवश्यक आहे.

असा करा अर्ज -

- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी http://www.iocl.com या सं केतस्थळाला भेट द्.

- या त्यानंतर Apprentice टॅबवर क्लिक करा.

- याठिकाणी तुम्हाला Apply Online चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

- समोर आलेला फॉर्म व्यवस्थित वाचा आणि भरा.

- त्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे जोडा.

- फॉर्मचे शुल्क भरून तो सबमिट करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com