Chandrayaan-3 Explainer: चांद्रयान, विक्रम, प्रज्ञान नावांचा संस्कृत भाषेशी संबंध काय?

Chadrayaan-3 Explainer: चांद्रयान मोहिमेतील प्रज्ञान रोव्हर, विक्रम लँडर आणि विकास इंजिन या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
Chandrayaan-3
Chandrayaan-3Saam Tv
Published On

Chadrayaan-3 Explainer:

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर जगभरातून भारताचं कौतुक होत आहे. भारताचं विक्रम लँडर चंद्रावर पोहोचल्यानंतर चंद्राचे नवनवीन फोटो आणि त्याबद्दल माहिती मिळत आहे. याचदरम्यान, चांद्रयान मोहिमेतील प्रज्ञान रोव्हर, विक्रम लँडर आणि विकास इंजिन या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. या नावांचं संस्कृत कनेक्शन जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

इस्त्रोचे प्रमुख श्रीधरा सोमनाथ यांनी या नावांबद्दल मोठं भाष्य केलं. श्रीधरा सोमनाथ यांनी म्हटलं की, भारतीय साहित्य संस्कृतमध्ये लिहिण्यात आलं आहे. आपल्या भारतीय साहित्यात तत्वज्ञान आहे. या भाषेतील वाक्यरचनेची पद्धत विज्ञानाजवळ घेऊन जाते. या भाषेची रचना एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे'.

Chandrayaan-3
Eknath Shinde News In Marathi: मुंबईचा आर्थिक कायापालट करणार; CM एकनाथ शिंदेंनी सांगितला मास्टर प्लान

चांद्रयानचा अर्थ काय?

चांद्रयानाला संस्कृतमध्ये चंद्रावर जाणारं यान म्हणण्यात आलं आहे. चांद्रयान हे नाव मिशनसाठी योग्य होतं.

प्रज्ञान - प्रज्ञान हे सहा चाकाचं रोव्हर आहे. गेल्या काही दिवसांपासून हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. या रोव्हरच्या माध्यमातून चंद्रावर संशोधन सुरू आहे. संस्कृतमध्ये प्रज्ञानचा अर्थ 'बुद्धमत्ता' असा होतो.

विक्रम - संस्कृतमध्ये विक्रमचा अर्थ शूर आणि धाडसी असा होतो. तसेच इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावासोबतही कनेक्शन आहे.

विकास - विकास हे एक प्रकारचं लिक्विड फ्यूल इंजिन आहे. याचा अर्थ पुढे जाणे किंवा प्रगती करणे होतो. विकास इंजिन हे चांद्रयान-३ रॉकेटचं कोर इंजिन होतं. तसेच विक्रम अंबालाल साराभाई यांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म देखील आहे.

Chandrayaan-3
Sharad Pawar On Chhagan Bhujabal: '...तर भुजबळ तुरुंगात गेले असते', शरद पवारांचं तेलगी प्रकरणावर मोठं विधान

'प्रज्ञान रोव्हर'च्या मार्गावर आला भला मोठा खड्डा

चांद्रयान मोहिमेअंतर्गत 'प्रज्ञान रोव्हर' गेल्या काही दिवसांपासून चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे . याच 'प्रज्ञान रोव्हर'च्या प्रवासाची महत्वाची माहिती समोर आली आहे. हे रोव्हर फिरत असताना त्याच्यासमोर ४ मीटर मोठा खड्डा आला होता. त्यानंतर रोव्हरला नवीन मार्गावर नेण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com