John Abraham: एका व्यक्तीमुळं बदललं जॉन अब्राहमचं आयुष्य; रातोरात नशिबाचं चक्र फिरलं अन्...

महेश भट्ट यांनी जॉन अब्राहमला चित्रपटात काम करण्याची पहिली संधी दिली.
John Abraham Celebrate hos 50th Birthday
John Abraham Celebrate hos 50th BirthdaySaam Tv

John Abraham Birthday Special: अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या फिटनेसमुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जॉन अब्राहमचा जन्म 17 डिसेंबर 1972 रोजी झाला. आज जॉनचा ५० वा वाढदिवस आहे. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या जॉनची ओळख अॅक्शन हिरो अशी आहे. कॉमिक ते रोमँटिक हिरोपर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. जॉनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याचा पहिला चित्रपट कसा मिळाला याविषयी.

John Abraham Celebrate hos 50th Birthday
Akshay-Salman: अक्षय कुमारचा इमोशनल व्हिडिओ पाहून सलमान खान झाला भावूक, म्हणाला 'अक्की तू अमेझिंग आहेस'

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जॉन अब्राहम मॉडेलिंग करायचा तसेच एका जाहिरात कंपनीत काम करत होता . जॉनला या एजन्सीकडून जवळपास 13,800 रुपये मिळायचे. चित्रपटांपूर्वी त्यांनी म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले होते. मॉडेलिंगच्या दुनियेत ठसा उमटविलेल्या जॉन अब्राहमला महेश भट्ट यांनी त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. (John Abraham)

महेश भट्ट त्यांच्या 'जिस्म' चित्रपटासाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते, ज्याचे व्यक्तिमत्त्वात संजय दत्तसारखा होता. महेश भट्टचा हा शोध जॉनला पाहिल्यावर पूर्ण झाला. त्यांनी जॉनला सांगितले की ' मला तुला ज्या चित्रपटात घ्यायचे आहे तो ऑफबीट आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षक ठरवतात की त्यांना हा चित्रपट आवडला की नाही. (Bollywood)

जॉन अब्राहमने महेश भट्टची ही अट मान्य केली आणि 2003 मध्ये 'जिस्म' चित्रपटातून डेब्यू केला. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. 17 ते 18 वर्षांच्या कारकिर्दीत जॉनने अभिनेता म्हणून सुमारे 40 चित्रपटांमध्ये आणि निर्माता म्हणून सात चित्रपटांमध्ये काम केले आहे.

जॉन अब्राहमला तुम्ही अनेकदा बाइकवर पोज देताना पाहिलं असेल. खरंतर जॉन अब्राहमला बाइक्सचा खूप शौक आहे आणि त्याच्याकडे बाइक्सचे खूप छान कलेक्शन आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com