Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

Bipasha Basu: बिपाशा बासूने एका प्रसिद्ध प्रोटीन पावडरच्या नवीन डब्यात लहान कीटक आढळल्याचा दावा केला. तिने तुकाराम मुंढेंना टॅग करत उत्पादनाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली.
Bipasha Basu
Bipasha BasuSaam Tv
Published On

Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने एका प्रोटीन पावडरच्या क्वालिटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. नुकताच उघडलेल्या एक प्रसिद्ध ब्रँडच्या प्रोटीन पावडरच्या डब्यात अळी सापडल्याचा दावा बिपाशाने केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग करत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

बिपाशाने व्हिडिओ शेअर करत दाखवले अळी

बिपाशा बासूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आपल्या बोटावर असलेला एक अतिशय लहान अळी दाखवताना दिसत आहे. हा प्रोटीन पावडरचा नवीन डबा असल्याचे तिने सांगितले. डबा नुकताच उघडला असतानाही त्यामध्ये अनेक लहान अळी सापडल्याचा दावा अभिनेत्रीने केला व्हिडिओमध्ये बिपाशा म्हणते की, 'या' प्रसिद्ध ब्रँडच्या प्रोटीन पावडरमध्ये ठिकठिकाणी लहान अळी असल्याचे मला दिसले. खूप लहान कीटक. हा एक नवीन डबा आहे जे आम्ही नुकताच उघडला आहे. हे बघा त्या अळी. हा डबा अशाच अळींनी भरलेले आहे.

Bipasha Basu
80s च्या ट्रेंडने सोशल मीडियावर क्रेझ; आमिर खानपासून कियारा आडवाणीपर्यंत सेलिब्रिटींचा भन्नाट रेट्रो लूक

तुकाराम मुंडेंना केली मदतीची विनंती

बिपाशाने या प्रकरणात थेट महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केले. त्यांना टॅग करत अभिनेत्रीने लिहिले, “तुम्हीच आमची एकमेव आशा आहात जेणेकरून आम्ही खरेदी केलेली प्रोडक्ट चांगले किंवा भेसळमुक्त असतील.”

Bipasha Basu
Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

तुकाराम मुंढेच्या कारवाईची चर्चा

महाराष्ट्रात सध्या अन्न सुरक्षेबाबत प्रशासनाकडून विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई केली जात आहे. दूध, पनीर तसेच इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही आस्थापनांवर दंडात्मक कारवाई तसेच परवाने निलंबित करण्याची पावलेही उचलण्यात आली आहेत.

प्रीती झिंटा, ट्विंकल खन्नाचाही पाठिंबा

तुकाराम मुंडे यांच्या अन्न सुरक्षा मोहिमेकडे बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींचेही लक्ष वेधले गेले आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा नुकतीच ‘टीम तुकाराम मुंढे’ हा काळा टी-शर्ट परिधान केला होता. तर ट्विंकल खन्नानेही सरकारी अधिकारी आपले कर्तव्य बजावत असल्याबद्दल सोशल मीडियावर भाष्य केले होते. आता बिपाशा बासूने थेट प्रोटीन पावडरमधील अळी असल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने अन्न सुरक्षेची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com