Suraj Chavan : काळी साडी, हलव्याचे दागिने सूरज चव्हाणच्या बायकोचा थाट न्यारा; लग्नानंतरच्या पहिल्या सणाची तयारी सुरू, VIDEO होताय व्हायरल

Suraj Chavan Viral Video : सूरज चव्हाणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात सूरज संजनासोबत लग्नानंतरचा पहिला सण साजरा करताना दिसत आहे.
Suraj Chavan Viral Video
Suraj Chavansaam tv
Published On
Summary

सूरज चव्हण सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

सूरज चव्हणने नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर सूरज आणि संजना पहिला सण साजरा करताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हण 29 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकला. सूरजने चुलत मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे , लग्नानंतरच्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात सूरज आणि संजना लग्नानंतरचा पहिला सण साजरा करताना दिसत आहे.

सूरज चव्हणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात सूरज आपल्या बायकोसोबत लग्नानंतरचा पहिला सण मकरसंक्रांत साजरी करताना दिसत आहे. "पहिली मकर संक्रांत...नव्या नात्याची, नव्या सुरुवातीची..." असे कॅप्शन व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीओर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यांच्या लूकचे कौतुक होताना दिसत आहे. तसेच नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सूरज - संजना लूक

संजनाने सुंदर काळ्या रंगाची काठा-पदराची नऊवारी साडी नेसली आहे. सुंदर साज श्रृंगार करून संजना नटली आहे. तिने हलव्याचे सुंदर दागिने परिधान केले आहे. ज्यात तिचे सौंदर्य खुलले आहे. केसांचा बन, सुंदर गजरा तिने माळला आहे. मिनिमल मेकअप, कपाळावर बंदी , नाकात नथ घालून सूरजची नवरी शोभून दिसत आहे. सूरजने ऑफ व्हाइट रंगाची सदरा परिधान केला आहे. दोघे एकत्र खूप भारी दिसत आहे.

पतंगबाजी

व्हिडीओमध्ये सूरज आणि संजनाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघे एकत्र पतंग उडवताना दिसत आहे. दोघे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. संजनाच्या हातात फुलांनी भरलेले ताट पाहायला मिळत आहे.

Suraj Chavan Viral Video
Emraan Hashmi : इमरान हाश्मी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी; पोटातले टिश्यू फाटले, नेमकं घडलं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com