Bigg Boss Marathi Season 4: 'आम्ही वेगळे झालो तर त्यांना नॉमिनेट करू' किरण मानेचा कोणाला सल्ला?

दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या या खेळात आणखीनच रंग चढत आहे. नुकत्याच झालेल्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सर्वांचीच हजेरी घेतली.
Bigg Boss Contestant
Bigg Boss Contestant Saam Tv
Published On

मुंबई: काल झालेल्या चावडीवर महेश मांजरेकरांनी (Marathi Actors) सर्व सदस्यांना चांगलाच घरचा आहेर दिला. यावेळी कोणाचे कौतूक केले तर कोणाची कान उघडणी यावेळी करण्यात आली (Bigg Boss). गेल्या १५ दिवसांपासून बिग बॉसच्या घरात खेळ रंगत आहे. नुकताच या खेळाला चांगलीच शान येत असल्याचे दिसत आहे. आजपासून नव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात वादाचा रंगलेला पहिला अंक काही काळासाठी का होईना शांत झाला होता. आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात वादाचे सत्र सुरु झाले आहे. पण पहिल्याच दिवशी किरण माने आणि योगेशमध्ये वादाची ठिणगी पडल्याची दिसत आहे. (Bigg Boss Marathi Season 4)

Bigg Boss Contestant
Fu Bai Fu: 'जिथे असाल तिथे हसाल' आता पुन्हा खळखळून हसणार महाराष्ट्र

दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या या खेळात आणखीनच रंग चढत आहे. नुकत्याच झालेल्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सर्वांचीच हजेरी घेतली. या हजेरीत कोणाचे चांगल्या कामावरुन कौतूक झाले तर कोणाची कान उघडणी केली. यासर्व गोष्टींमध्ये आणखी एक गोष्ट रंगली ती म्हणजे एलिमिनेशनची. दोन आठवडे घरात खेळल्यानंतर कोणत्या सदस्याला बाहेरचा रस्ता गाठावा लागेल याची उत्सुकता लागली आहे. अमृता धोंगडे, रोहित शिंदे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के हे डेंजर झोनमध्ये असल्याने एकाला बाहेर जावे लागले तो खेळाडू म्हणजे निखिल राजेशिर्के. काल निखिलला घरातून बाहेर गेला आहे.

Bigg Boss Contestant
Bigg Boss Marathi Season 4: खेळाडूंसाठी नवे नॉमिनेशन कार्य, कोणते स्पर्धक नॉमिनेट होणार याकडे सर्वांचे लक्ष

नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकास, किरण माने या दोघांमध्ये एका विषयावर चर्चा करताना योगेश विकासला सल्ला देताना दिसत आहे. "बिग बॉसच्या घरात कुजबुज करण्यास सक्त मनाई आहे" विकास त्यावर योगेशला म्हणतो, "हे सगळ्यात जास्त तुलाच शोभतं आहे. किरण मानेला योगेशने विचारले की नक्की म्हणणं काय आहे ?

त्यावर किरण म्हणतो, “तुला बोललो कि फिक्स आहे तो नाही पाहिजे. तुझ्या बरोबर जे आहेत त्यांचे तू सांभाळ, तो नाही पाहिजे. तू काय ते सांगायची वाट बघतो आहे आम्ही... तुझी घुसमट झाली आहे, बॉण्ड मध्ये अडकला आहे तू. गंमत करतो आहे मी, नाही करू शकत का? चेष्टा पण करायची मुश्किल झाली आहे इथे. आम्ही वेगळे झालो तर त्यांना नॉमिनेट पण करू, आम्ही त्यांच्याबरोबर नाही हे लक्षात ठेव. विकास त्यावर म्हणतो, "तो इथे पण बोलतो आणि तिथे पण बोलतो, तुझं तोंड उघडत नाही लवकर.

या चर्चेनंतर सर्व स्पर्धक कोणत्या खेळाडूला नॉमिनेट करणार हे आजच्या भागात समजणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com