Fu Bai Fu: 'जिथे असाल तिथे हसाल' आता पुन्हा खळखळून हसणार महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सर्व हुरहुन्नरी विनोदवीर आपल्या खास शैलीत आपल्या प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी 'फू बाई फू'ची 'जिथे असाल तिथे हसाल' अशी संकल्पना असणार आहे.
Official Promo
Official Promo Instagram/ @zeemarathiofficial
Published On

मुंबई: गेल्या ९ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला खळखळून हसवण्यासाठी 'फू बाई फू'ची टीम सज्ज झाली होती. बरेच कॉमेडीस्टार या कार्यक्रमाने महाराष्ट्राला दिले आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे एकूण १४ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत (Entertainment). 'फू बाई फू' या कार्यक्रमाने अवघ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसवलेय. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाला ही खास मेजवानी घेऊन सज्ज झाले आहेत. सर्वांनाच हसवण्यासाठी 'फू बाई फू' हा कार्यक्रम येणार म्हटल्यावर झी मराठीच्या प्रेक्षकांना एक सुख:द धक्का मिळाला आहे. (Marathi Entertainment News)

Official Promo
Bigg Boss Marathi Season 4: खेळाडूंसाठी नवे नॉमिनेशन कार्य, कोणते स्पर्धक नॉमिनेट होणार याकडे सर्वांचे लक्ष

या कार्यक्रमात काही जुने विनोदवीर ही आपल्याला पुन्हा दिसणार असून त्यांच्या सोबत नवीन विनोदवीरही या कार्यक्रमात दिसणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व हुरहुन्नरी विनोदवीर आपल्या खास शैलीत आपल्या प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी 'फू बाई फू'ची 'जिथे असाल तिथे हसाल' अशी संकल्पना असणार आहे. यावेळी या कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी वैदेही परशुरामी पेलणार आहे. ती पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुत्रसंचालनाची जबाबदारी घेणार आहे. या माध्यमातून वैदेही टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. (Marathi Actor) (Marathi Actress)

या कार्यक्रमातील परिक्षणाचे शिवधनुष्य अभिनेता उमेश कामत आणि जेष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत सांभाळणार आहे. त्यामुळे सर्वांनाच या फ्रेश प्रेक्षकांच्या जोडीने कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता आहे. या कार्यक्रमातून नक्की कोणती जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल?, कोणती जोडी कॉमेडीचा तडाका लावणार पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com