Megha Ghadge: 'बिग बॉस मराठी' फेम मेघा घाडगे बनणार 'अप्सरा', १० मेपासून येणार भेटीला

Megha Ghadge Apsara Film: या चित्रटामध्ये मेघा घाडगेसोबतच अभिनेता विठ्ठल काळे झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून हा चित्रपट रोमँटिक असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Megha Ghadge Apsara Film
Megha Ghadge Apsara FilmSaam Tv

Apsara Movie:

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फेम आणि 'लावणी क्वीन' म्हणून ओळख असलेली अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) सध्या चर्चेत आहे. मेघा घाडगेने अनेकदा एक सशक्त अभिनेत्री म्हणूनह स्वतःचा ठसा उमटवलाच आहे. लवकरच ती नव्या चित्रपटच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेघा घाडगेच्या 'अप्सरा' चित्रपटाची (Apsara Movie) नुकताच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रटामध्ये मेघा घाडगेसोबतच अभिनेता विठ्ठल काळे झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून हा चित्रपट रोमँटिक असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सुनील भालेराव यांच्या 'श्रमण फिल्म्स' या निर्मिती संस्थेमार्फत अप्सरा चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या संस्थेमार्फत निर्मिती करण्यात येणारा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. चंद्रकांत पवार यांनी दिग्दर्शक म्हणून यापूर्वी 'विठ्ठला शप्पथ' हा उत्कृष्ट चित्रपट दिला आहे. आता 'अप्सरा' चित्रपटातून आणखी एक नवी गोष्ट घेऊन ते आपल्या भेटीस येत आहेत.

अप्सरा चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मेघा घाडगेने आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अप्सरा हा चित्रपट तिच्यासाठी वेगळा ठरणार आहे. कारण या चित्रपटात ती साकारत असलेली भूमिका ही अनोखी असणार आहे. यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागणार आहे. तसेच आपल्या बहुआयामी भूमिकेतुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर नुसत्या आपल्या बोलक्या डोळ्यातून अभिनयाची मोहोर उमटवणारे अभिनेते विट्ठल काळे हे देखील चित्रपटाची जमेची बाजू असणार आहेत.

Megha Ghadge Apsara Film
Aai Kuthe Kay Karate Serial: हा प्रवास कायम स्मरणात राहील..., 'आई कुठे काय करते'च्या अरुंधतीची आषुतोषसाठी खास पोस्ट

दरम्यान, मेघा घाडगे यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या अभिनय आणि नृत्याच्या माध्यमातून ती कायम चर्चेत राहते. मेघा घाडगे मराठी बिग बॉसच्या सीझन ४ मध्ये सहभागी झाली होती. मेघा घाडगे सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना नवनवीन प्रोजेक्टची अपडेट्स देत असते.

Megha Ghadge Apsara Film
Crew: क्रिती सेनॉन- करीना कपूर आणि तब्बू एकाच वेळी चर्चेत! असं काय घडलंय इंडस्ट्रीत?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com