Bigg Boss Marathi 6 : "घराबाहेर काढेन..."; 'या' सदस्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार, रितेश भाऊंनीच दिला थेट इशारा| VIDEO

Riteish Deshmukh Bhaucha Dhakka : भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुख अनुश्रीवर संतापतो. तर घरातील एका सदस्याला थेट एलिमिनेट करेन असा इशारा देतो. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर आज तुफान राडा पाहायला मिळणार आहे.
Riteish Deshmukh Bhaucha Dhakka
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घरात गणपती येतात.

अनुश्री प्राजक्तासोबत खूपच उद्धटपणे वागते, त्यामुळे रितेश भाऊ अनुश्रीवर संतापतात.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घरातील एका सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.

आज बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का गाजणार आहे. रितेश देशमुख अनुश्री माने ते सोनाली राऊत सगळ्यांची शाळा घेताना दिसणार आहे. रितेश अनुश्रीला तिच्या घरातील दादागिरीवरून चांगले खडेबोल सुनावतो. तर घरातील एका सदस्याला थेट एलिमिनेट करणार असल्याचा इशारा देतो. त्यामुळे घरातील वातावरण खूपच गंभीर पाहायला मिळते. या आठवड्यात 'शेणाचं दार अन् मेणाचं दार' हा कॅप्टन्सी उमेदवारीसाठी टास्क खेळला गेला. या खेळात 'पॉवर Key' जिंकून कॅप्टन्सी उमेदवारी मिळवण्याची संधी होती.

'शेणाचं दार अन् मेणाचं दार' हा कॅप्टन्सी टास्क सोनाली राऊत खेळली नाही. त्यामुळे बिग बॉसने तिला पुढच्या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट केले. या मुद्द्यावरून रितेश भाऊ सोनालीवर चांगलेच भडकणार आहेत. बिग बॉसला घराचा दुसरा कॅप्टन भेटला आहे. येणाऱ्या आठवड्यात आयुष संजीवकडे बिग बॉसच्या घराची सत्ता पाहायला मिळणार आहे.

रितेश भाऊ सोनालीला म्हणतात की, "सोनाली तुम्ही ठरवलं, की त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही नाही उभ्या राहणार... मग, तुम्ही आलात कशाला येथे? टास्क खेळायला आलात ना तुम्ही..." त्यावर सोनाली म्हणते की, "पण मला जे वाटलं..." इतक्यात रितेश भाऊ सोनालीला थांबवत म्हणतो की, "ओ एक मिनिट, हा Attitude ना तुमच्या घरी ठेवायचा. या घरात नाही...इथे सगळे सारखे आहेत. यावेळी नॉमिनेट केलंय... पुढच्या वेळेस घराच्या बाहेर काढेन..."

रितेश देशमुखचे हे बोलणे ऐकताच सोनालीचा चेहरा उतरतो. तसेच घरात तणावाचे वातावरण निर्माण होते. आता रितेश भाऊंनीच थेट घराबाहेर जाण्याचा इशारा दिल्यामुळे सोनालीच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार पाहायला मिळणार आहे. तसेच सोनालीने वेळेत आपला गेम बदलला नाही तर तिला खरंच घराबाहेर काढू शकतात. आता भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय, काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

Riteish Deshmukh Bhaucha Dhakka
Bigg Boss Marathi 6 : "मस्तीत नाही शिस्तीत राहायचं..."; अनुश्रीवर संतापला रितेश भाऊ, कठोर शब्दात केली कानउघडणी-VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com