Bigg Boss Marathi 6 Ticket to Finale: 'बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. सागर कारंडेने नुकताच बिग बॉसचा निरोप घेतला आहे.आता राहिलेल्या स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्याची चुरस आणखी वाढली आहे. जसा बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले असून जवळ येत आहे तस फायनलपर्यंत थेट पोहोचण्याची संधी घरातील सदस्यांना मिळणार आहे. यासाठी घरात 'तिकीट टू फिनाले'चा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये बाजी मारणारा सदस्य थेट बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचणार असून आता या टाक्सचा प्रोमो समोर आला आहे.
'तिकीट टू फिनाले' या टास्कचा प्रोमो समोर आला असून, बिग बॉस सदस्यांना यामुळे मोठी संधी मिळणार आहे. ‘टिकिट टू फिनाले’ जिंकणारा सदस्य हा या सीझनचा पहिला फायनलिस्ट ठरणार असल्याने घरातील वातावरण अधिकच तापलं आहे. प्रत्येक जण या संधीसाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसणार आहे.
सध्या घरात तन्वी कोलते, राखी सावंत, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद, रेवा कौरासे आणि राकेश बापट असे टॉप ७ स्पर्धक शिल्लक आहेत. नुकत्याच झालेल्या एलिमिनेशनमध्ये सागर कारंडे बाहेर पडल्याने स्पर्धा आणखी कठीण झाली आहे. आता या सातपैकी कोण स्पर्धक टॉप ५ मध्ये पोहोचणार आणि पुढे फायनलमध्ये स्थान मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘टिकिट टू फिनाले’ टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये तणाव वाढल्याचेही पाहायला मिळत आहे. याआधीच्या टास्कमध्ये राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात जोरदार वाद झाला होता, जो हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या टास्कमध्येही तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटियन हे सध्या मजबूत दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे ‘टिकिट टू फिनाले’ टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि थेट फायनलमध्ये पोहोचणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एकंदरीत, बिग बॉस मराठी ६ आता निर्णायक वळणावर आला असून प्रत्येक टास्कसोबत स्पर्धा अधिक रंगत चालली आहे. त्यामुळे येणारे भाग प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक ठरणार आहेत.