Sonakshi Sinha: शत्रुघ्न सिन्हा आजोबा होणार, मुलगी सोनाक्षी प्रेग्नेंट? आईने केला मोठा खुलासा

Sonakshi Sinha: अभिनेत्री पूनम सिन्हा यांनी आपली मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नेंसीबद्दल मोठा खुलासा केला आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा खुलासा करुन सगळ्यांना थक्क केले.
Sonakshi Sinha
Sonakshi SinhaSaam Tv
Published On

Sonakshi Sinha : बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या कामासह तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील नेहमी चर्चेत असते. तिचे अभिनेता जहीर इकबालसोबत लग्न झाल्यापासून तर ती आणखी चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामध्ये मागच्या काही महिन्यापासून या अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या चर्चांना सोनाक्षी सिन्हाची आई प्रसिद्ध अभिनेत्री पूनम सिन्हा यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

किती वेळा 'आजी' बनवले...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्याप्रेग्नेंसीच्या अफवांमुळे वारंवार चर्चेत असते आणि तिने अनेकदा अशा अटकळींचे खंडन केले आहे. आता, सोनाक्षीची आई पूनम सिन्हा यांनीही 'इन्स्टंट बॉलिवूड'शी संवाद या अटकळींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, प्रसारमाध्यमांनी मला आतापर्यंत किती वेळा 'आजी' बनवले आहे. पण, आज ना उद्या ती गोड बातमी नक्कीच येईल आणि ज्या दिवशी ती ही बातमी देईल, त्या दिवशी या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती मी असेन.

Sonakshi Sinha
Dhurandhar 2 Collection: तिसऱ्या शनिवारी, 'धुरंधर २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; केली इतक्या कोट्यवधींची कमाई

मुलींशिवाय आयुष्य अपूर्ण...

त्यांनी आपली मुलगी सोनाक्षी जेव्हा त्यांच्या आयुष्यात आली, त्या क्षणाची आठवणही सांगितली. त्या म्हणाल्या, 'तो खरोखरच आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता. जेव्हा आमच्या घरात एका मुलीचे आगमन झाले. मला मनापासून वाटते की मुलींशिवाय आयुष्य अपूर्ण असते. प्रत्येकाच्या आयुष्यात मुलगी असणे अत्यंत आवश्यक आहे.'

Sonakshi Sinha
Actor Break on Social Media: 'एक छोटा ब्रेक घेतोय…'; बाबा झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा सोशल मीडियापासून ब्रेक, कारण काय?

जेव्हा खरोखरच ती 'गोड बातमी' येईल...

गेल्या वर्षी, सोनाक्षी सिन्हा तिचा पती जहीर इक्बाल याच्यासोबत एका हाय-प्रोफाईल दिवाळी पार्टीला उपस्थित राहिली होती. सोनाक्षीचा मोहक पारंपरिक पोशाख आणि तिचे फोटो पोज पाहून, लोकांनी असा अंदाज वर्तवायला सुरुवात केली की ही अभिनेत्री कदाचित प्रेग्नेंट आहे. नंतर, या बातम्यांचे खंडन करत सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर लिहिले, " मी प्रेग्नेंट वाटते कारण मी फक्त पोटावर हात ठेवून पोज दिली म्हणून पण जेव्हा खरोखरच ती 'गोड बातमी' येईल, तेव्हा आम्ही ती नक्कीच सर्वांशी शेअर करू."

सोनाक्षी आणि जहीर

सोनाक्षी आणि जहीर यांनी २३ जून २०२४ रोजी 'विशेष विवाह कायद्या'अंतर्गत (Special Marriage Act) विवाह केला. लग्नानंतर, या जोडप्याने एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. ज्यात अनेक नामवंत तारे-तारकांनी उपस्थिती लावली होती. हे कपल आपल्या सुखी वैवाहिक जीवनातील काही क्षण वारंवार आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com