बिग बॉसच्या घरातून गेल्या आठवड्यात सागर कारंडेची एक्झिट झाली.
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात ५ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
'बिग बॉस मराठी 6' चा ग्रँड फिनाले लवकरच थाटामाटात पार पडणार आहे.
'बिग बॉस मराठी ६' गेल्या दोन-तीन महिने प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करत आहे. या सीझनला प्रेक्षकांनी भरपूर चांगला प्रतिसाद दिला. आता 'बिग बॉस मराठी ६' शेवटच्या टप्प्यावर आले आहे. घरात तिकीट टू फिनालेसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. नुकताच घरात तिकीट टू फिनाले टास्क रंगला आहे.
बिग बॉसच्या घरात सध्या १३ वा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी ५ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात खालील सदस्यांचा समावेश आहे.
राकेश बापट
अनुश्री माने
विशाल कोटियन
दिपाली सय्यद
'तिकीट टू फिनाले' जिंकण्यासाठी बिग बॉसच्या घरात महाटास्क रंगला. राकेश बापट , अनुश्री माने, आणि तन्वी कोलतेमध्ये 'तिकीट टू फिनाले' टास्क रंगला. टास्कमध्ये राकेश बापट आणि तन्वी कोलतेला कोळ्याचे जाळे पार करायचे होते. त्यानंतर सात प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. यात राकेश बापटला हरवत तन्वी कोलतेने बाजी मारली आणि 'तिकीट टू फिनाले' जिंकले. तन्वी कोलते बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासून खूप सक्रिय आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सर्वत्र तन्वी कोलतेच 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
रेवा कौरासे या आठवड्याची कॅप्टन असल्यामुळे ती सेफ आहे. आता या आठवड्यात शेवटच्या टप्प्यात येऊन कोणाचा प्रवास संपणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी राखी सावंतच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मात्र याचा खुलासा भाऊच्या धक्क्यावरच होईल. येणार भाऊचा धक्का खूपच खास असणार आहे. रितेश भाऊ नवीन धमाके करतील. 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी कोण उचलणार याची हे पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.