प्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अभिनेत्याच्या वडीलांचे निधन झाले.
वडीलांनी वयाच्या 76 वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मराठी मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. ' तू ही रे माझा मितवा' फेम मराठी अभिनेते शेखर फडके यांच्या वडीलांचे म्हणजेच विजयकुमार फडके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही दुःखद बातमी सांगितली आहे. वडीलांच्या अचानक जाण्याने अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.विजयकुमार फडके यांनी त्यांच्या वाढदिवशीच अखेरचा श्वास घेतला आहे. कलाकार आणि चाहत्यांनी अभिनेत्याच्या वडीलांवर श्रद्धांजली वाहिली आहे.
"दुःखद बातमी
आज दिनांक 6 एप्रिल रोजी, माझ्या बाबांना, विजयकुमार फडके यांना पहाटे 2 वाजता देवाज्ञा झाली...
बाबा 76 वर्षांचे होते आणि आजच त्यांचा वाढदिवस होता
(6 एप्रिल 1949- 6 एप्रिल 2026)
त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी, तुमची प्रार्थना उपयोगाची पडणार, यासाठी तुम्हाला कळवत आहे...
(मी शेखर फडकेआणि माझा भाऊ शिरीष फडके आणि परिवार )"
शेखर फडके हे मनोरंजन विश्वातील एक मोठे नाव आहे. आजवर त्यांनी अनेक चित्रपट, मालिका , नाटके यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'फुलाला सुगंध मातीचा', 'आपला बुआ असा आहे', 'नवा गडी नवं राज्य', 'विठू माऊली', '405 आनंदवन', यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. 'आटली बाटली फुटली', 'गडबड गोंधळ', 'थैमान', 'निवडुंग' या चित्रपटांमध्ये झळकले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.