Bigg Boss House
Bigg Boss HouseSaam Tv

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

Bigg Boss House: बिग बॉस मराठी सीझन ६’ चा ग्रँड प्रीमियर आज 11 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. त्याआधी या बिग बॉसच्या घराची पहिली झलक समोर आली आहे.
Published on

Bigg Boss House: बिग बॉस मराठी सीझन ६’ चा ग्रँड प्रीमियर आज 11 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता होणार असून चाहत्यांमध्ये शोबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रितेश देशमुखचा होस्ट म्हणून परत येणारा हा सीझन पुन्हा मनोरंजनाने भरलेला असेल. यासह यंदाच्या घराची डिझाइन देखील विशेष असणार आहे.

शो सुरू होण्याआधीच अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर घराची झलक समोर आली आहे. पारंपारिक डेकोरपेक्षा यंदा घराची रचना अधिक इनोव्हेटिव्ह आणि थीमवर आधारित दिसते. या घरात असंख्य दरवाजे (doors) म्हणजेच अनेक ठिकाणी दरवाज्यांचा वापर करण्यात आला असल्याचं फोटोतून स्पष्ट आहे. किचन, कॅप्टन रूम, कन्फेशन रूम आणि इतर विविध भागांमध्ये हे दरवाजे ठळकपणे दिसतात. यामुळे घराच्या इंटीरियरला एक रहस्यमय व लुक मिळाला आहे.

Bigg Boss House
Kriti Sanon Sister: नुपूर आणि स्टेबिन अडकले विवाहबंधनात; बहिणीच्या लग्नात क्रिती सॅननला अश्रू अनावर

अतिरिक्त खोल्या जसे की कन्फेशन रूम, कॅप्टनची खोली, स्वयंपाकघर, बेडरूम, गार्डन एरिया आणि बाथरूम यांना स्वतंत्र दरवाज्यांसह सजवण्यात आले आहे. प्रत्येक कोपऱ्यात लपलेला ट्विस्ट आणि युनिक डिझाइन एलिमेंट्स पाहायला मिळतात. यामुळे घराची अनोखी ओळख प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे.

Bigg Boss House
Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

यंदाच्या घराविषयी चाहत्यांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींना हा फर्स्ट लूक फारच आवडला आहे, तर काही लोक नवीन डिझाइनची तुलना पूर्वीच्या पर्वांशी करत आहेत. शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक लवकरच या आलिशान आणि सर्जनशील घरात प्रवेश करणार आहेत; त्यामुळे पुढील टास्क, गेम्स आणि मनोरंजन अधिक रोमांचक होतील अशी अपेक्षा आहे.

दर्शकांची उत्सुकता इतकी प्रचंड आहे की शोच्या घराच्या दरवाज्यांबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही चर्चा रंगली आहे. हे दरवाजे फक्त इंटीरियर डिझाइनसाठीच नसून कदाचित शोतील विविध टास्क आणि ट्विस्ट्ससाठी असू शकतात. हा खुलासा आज गोष्ट 8 वाजता सुरू होणाऱ्या बिग बॉस या कार्यक्रमात स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com