Bigg Boss Marathi 4: स्नेहलता घरात येताच स्पर्धकांमध्ये उभी फूट, दोन-तीन गट पडले

पहिलीच वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री मारलेली स्नेहलता वसईकर हिने पहिल्या दिवशी सर्व स्पर्धकांना कानमंत्र देताच दोन गटाचे रुपांतर तिसऱ्या गटात होण्याची शक्यता आहे.
Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4 Instagram/ @bbmarathi

Bigg Boss Marathi 4 Latest Update: बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धक अजून चांगल्या पद्धतीने खेळण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या चार आठवड्यांपासून बिग बॉसच्या घरात सर्व एकत्र राहत आहेत. एकमेकांसोबत प्रत्येक स्पर्धकाचे काही तरी नातेही तयार झाले. चार आठवड्यांत एकूण तीन स्पर्धकांना बिग बॉसच्या घराला कायमचे सोडावे लागले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या चावडीवर सर्वच स्पर्धकांची मांजरेकरांनी कानउघडणी केली. चावडी झाल्यानंतर प्रत्येक स्पर्धकांचा खेळण्याचा मार्ग सुधारतो किंवा बदलतो. आपण किती पाण्यात आहोत हे चावडी झाल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाला कळते.

Bigg Boss Marathi 4
Hrithik Roshan Saba Azad: हृतिक रोशनने दिल्या गर्लफ्रेंड सबा आझादला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात एकूण दोन गट झालेले आपण पाहिले आहेत. पण पहिलीच वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री मारलेली स्नेहलता वसईकर हिने बिग बॉसच्या घरात येताच तीन गट करण्याचा कदाचित मानस केला आहे. पहिल्या दिवशी सर्व स्पर्धकांना कानमंत्र देताच दोन गटाचे रुपांतर तिसऱ्या गटात होण्याची शक्यता आहे.

या गोष्टीचा खुलासा यशश्रीने केला आहे. आजच्या भागात यशश्री, त्रिशूल आणि समृद्धीमध्ये घरातील ग्रुप आणि सदस्यांचे कोणाशी चांगले आहे, कोण कोणाला आवडतं आणि कोणाचा ग्रुप पुढे जाऊ शकतो यावर चर्चा होणार आहे.

Bigg Boss Marathi 4
Katrina Kaif Halloween Costume: बायकोच्या हॅलोवीन फोटोशूटसाठी विकी बनला दिग्दर्शक, व्हिडिओ तुफान व्हायरल

या चर्चेत त्रिशूल बोलतो की, "याआधी देखील आपण बोललो, आपण आपली टीम बनवू शकतो." त्यावर समृध्दी म्हणते, "त्यावेळेस आपण खुपच उडत उडत बोललो होतो, पण आता आपल्याला कळत आहे परिस्थिती काय आहे ते. आपण overshadow नाही झालो पाहिजे यांच्यात. माझे, तुझे आणि यशश्रीचे सहमत आहे म्हणजेच आपण तिघे आता सेम मतावर आहोत... तुमची काय आहेत मत अजून कोण हवं?"

Bigg Boss Marathi 4
Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका, धमकी मिळाल्यापासून सुरक्षेत वाढ

समृद्धीच्या या मतावर यशश्री म्हणते "रु आणि रो ( रुचिरा आणि रोहित ) आपण बघुया पुढे काय होत सध्या कुठे नको बोलायला. कारण स्नेहलता, अमृता देशमुखच्या आणि अक्षयच्या बाजूने आहे. ती अपूर्वाच्या बाजूने पण नाहीये फार. पण अपूर्वा स्ट्राँग आहे आणि म्हणूनच ती तो ग्रुप पकडून चालणार आणि त्या चार जणांचा नक्कीच ग्रुप होणार". याचा अर्थ घरात स्नेहलताच्या येण्यानं आता स्नेहलता, अमृता देशमुख आणि अपूर्वा यांचा ग्रुप पडण्याची शक्यता आहे.

स्नेहलता वसईकरनं एंट्री घेताच अक्षय केळकर मला फार आवडतो असे सांगितले होते. अक्षय आणि अमृता देशमुख माझे फेव्हरेट आहेत असंही ती म्हणाली. त्याचप्रमाणे अपूर्वा नेमळेकर घरातील स्ट्रॉग पार्ट आहे आणि मला तिच्याबरोबर खेळायला आवडेल असंही तिचं मत होतं. त्यामुळे आता स्नेहलता तिच्या आवडत्या स्पर्धकांना घेऊन नवा ग्रुप करणार का? कॅप्टन्सी कार्यात घरात कोणत्या चर्चा रंगणार आणि कोणामध्ये वाद होणार हे आजच्या भागात आपल्याला कळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com