Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका, धमकी मिळाल्यापासून सुरक्षेत वाढ

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आलेल्या धमक्यांमुळे महाराष्ट्र सरकारने सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्याला आता Y+ दर्जाची सुरक्षा मिळणार आहे.
Salman Khan
Salman KhanInstagram/@beingsalmankhan

Salman Khan Security: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आलेल्या धमक्यांमुळे महाराष्ट्र सरकारने सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्याला आता Y+ दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. त्याचप्रमाणे अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनाही X श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानला आतापर्यंत मुंबई पोलिसांनी नियमित पोलीस संरक्षण दिले होते.

Salman Khan
No Shave November Bollywood: 'नो शेव्ह नोव्हेंबर' ट्रेंडमध्ये बॉलिवूड कलाकारांचा सहभाग, साजरा करण्यामागेही अनोखे कारण

आता सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. एकाच वेळी त्याच्यासोबत चार पोलिसांची फौज तैनात केली जाणार आहे. सोबतच, अक्षय कुमारला आता X श्रेणी सुरक्षा दिली जाईल, याचा अर्थ त्याच्या संरक्षणासाठी तीन सुरक्षा अधिकारी असतील. अनुपम खेर यांनाही X दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आपल्या संरक्षणाचा खर्च स्वत: सेलिब्रिटी उचलणार असल्याचे बोलले जात आहे.

Salman Khan
Happy Birthday Aishwarya: 'धुम २' साठी ऐश्वर्याने ३ दिवसांत घटवलं होतं १० किलो वजन

सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना या वर्षात जूनमध्ये धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. ज्यात सलमान आणि सलीम यांना 'मूसवाला सारखी हत्या' करण्याची धमकी देण्यात आली होती. सिद्धू मूसवाला हा पंजाबी गायक होता ज्याची पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील अनेक गुंडांना अटक केली होती, त्यापैकी अनेकांनी सलमानला लक्ष्य केल्याचीही कबुली दिली होती.

गुंडांनी 2017 मध्ये त्याच्या वाढदिवशी जंगी सेलिब्रेशन वेळी त्याच्या वांद्रे घराबाहेर आणि एकदा 2018 मध्ये त्याच्या पनवेल फार्महाऊसवर त्याच्या हत्येसाठी दोनदा प्रयत्न केला होता. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान धमकी मिळाल्यानंतर अनुपम खेर यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. तर 'खिलाडी' स्टारला त्याच्या नागरिकत्वावरुन सोशल मीडियावरील धमक्यांच्या आधारे सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com