Katrina Kaif Halloween Costume: बायकोच्या हॅलोवीन फोटोशूटसाठी विकी बनला दिग्दर्शक, व्हिडिओ तुफान व्हायरल

हॅलोवीन पार्टीसाठी कतरिनानो डीसी कॉमिक्सच्या हार्ले क्विनचा गेटअप केला होता.
Katrina Kaif Look In Halloween Party
Katrina Kaif Look In Halloween Party Instagram @katrinakaif

Katrina Kaif Vicky Kaushal Latest Update: कतरिना कैफ आणि विकी कौशल ही जोडी नेहमीच चर्चेत असते. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. दोघेही एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात आणि त्यावर कमेंट सुद्धा करत असतात. त्यांच्या लक्ष्मी पूजनाचे फोटो देखील विकी कौशलने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. नुकताच कतरिनाने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये विकी कौशल तिला सूचना देताना दिसत आहे.

Katrina Kaif Look In Halloween Party
Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका, धमकी मिळाल्यापासून सुरक्षेत वाढ

कतरिना तिच्या 'फोन भूत' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये कतरिनासह सिद्धांत चतुर्वेदी और ईशान खट्टर सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हॉलोवीन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतील कतरिनाच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. (Bollywood)

हॅलोवीनसाठी कतरिनाने केलेला लूक खूपच आकर्षक होता. कतरिनाच्या लूकची सगळीकडेच चर्चा होत आहे. हॅलोवीन पार्टीसाठी कतरिनानो डीसी कॉमिक्सच्या हार्ले क्विनचा गेटअप केला होता. (Actress)

कतरिनाने शेअर केलेल्या तिच्या व्हिडिओमध्ये विकी कौशल तिला फोटोशूटसाठी सूचना देताना दिसत आहे. तसेच विकी कतरिनाला पोज सांगतानाही दिसत आहे. कतरिनाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'जेव्हा नवरा दिग्दर्शक बनतो', असे लिहिले आहे. फॅन्स तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Social Media)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com