

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसचा चौथा सीझन संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या सीझनमधील प्रत्येक स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. येत्या ८ जानेवारी रोजी बिग बॉस मराठीचा फिनाले शो पार पडणार आहे. या सर्वांमध्ये सर्वाधिक प्रकाश झोतात आहे तो, तो किरण माने अर्थात साताऱ्याचा बच्चन...
सध्या सर्वत्र किरण मानेला आलेल्या लेटरमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. एका लेटरमुळे साताऱ्याचा बच्चन बराच भावूक झाला होता. चला तर जाणून घेऊया त्याच्या मॅसेजबद्दल.
बिग बॉसच्या घरातला प्रत्येक मिनिट टॉप फायनलिस्टसाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो त्यांच्या चाहत्यांसाठी पोटात गोळा आणणारा देखील आहे. अनेकदा रिअॅलिटी शो मध्ये प्रेक्षकवर्ग इतका गुंग होऊन जातो की या शो मध्ये घडणारे वाद, रुसवे-फुगवे, प्रेमाच्या गोष्टी या त्यांना आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग वाटतात अन् नकळत ते त्यावर व्यक्त होतात.
आता किरण मानेंनी टॉप ५ मध्ये पोहोचल्यावर पब्लिकच्या नावे मेसेज रुपानं लिहिलेलं ते लेटर म्हणूनच त्यांचे चाहते अधिक व्हायरल करताना दिसत आहेत.
किरण माने त्या मेसेजमध्ये लिहिले की, "नमस्कार, बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये आपल्या लाडक्या सातारच्या बच्चनची म्हणजेच किरण माने यांची एंट्री टॉप फाईव्ह मध्ये झालेली आहे. किरण माने त्यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर आणि आपण दिलेल्या भरभरुन मतांमुळेच इथवर पोहचला आहे. त्यामुळे सगळ्यात आधी सगळ्यांचे आभार..! पण आपल्या प्रेमाची खरी कसोटी आता लागणार आहे. "
पुढे तो म्हणतो, "टॉप स्पर्धकांमध्ये पोहचलेल्या आपल्या किरण माने यांना जिंकण्यासाठी आपल्याला आता वोटिंगचा पाऊस पाडायचा आहे. तेव्हा फक्त आपल्या स्वतःच्या फोन वरून नाही तर आपले मित्र- परिवार, संस्था, मंडळ, शाळा, कॉलेज अगदी जमेल तिथे, जमेल तसं भरपूर मतदान करायचं आहे. आपल्या या वाघाच्या दमदार खेळीमुळे तो इथवर पोहोचला आहे. तेव्हा आता आपल्या प्रेमामुळे आणि आपण केलेल्या वोटिंग मुळेच तो ट्रॉफी पर्यंत पोहचू शकतो. तेव्हा लावा ताकद..! आन होवून जाऊ दे... जाळ आन धूर संगटचं..!"
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.