Bigg Boss Season 4: इथं तिथं यहाँ वहाँ देखु जहाँ हाय 'अपूर्वाची'च हवा, पोस्टरगर्लची होते मुंबईच्या नाक्यावर चर्चा...

टॉप ५ च्या शर्यतीत अपूर्वा नेमळेकर ही एक तगडी स्पर्धक मानली जाते.
Apurva Nemlekar
Apurva NemlekarSaam Tv
Published On

Bigg Boss Season 4: गेल्या तीन महिन्यांपासून सर्वाधिक चर्चेत असलेला टेलिव्हिजन शो म्हणजे 'बिग बॉस मराठी.' सर्वाधिक टीआरपी देणारा हा शो येत्या काही दिवसांमध्येच प्रेक्षकांची रजा घेणार आहे. सलग तीन महिने प्रेक्षक हा शो मोठ्या आवडीने पाहत आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनीही भरघोस प्रतिसाद दिला.

Apurva Nemlekar
Bigg Boss Marathi 4: निकालाआधीच फायनलिस्टची चर्चा, स्मिता गोंदकरच्या 'या' विधानाने वेधले लक्ष

येत्या रविवारी अवघ्या महाराष्ट्राला बिग बॉसच्या घरातील चौथा विजेता स्पर्धक मिळणार आहे. मोठ्या दिमाखदार सोहळ्यात ही ट्रॉफी विजेत्याला दिली जाते. प्रत्येक स्पर्धकाने टॉप ५ मध्ये येण्यासाठी चांगलीच कंबर कसली. येत्या रविवारी बिग बॉसच्या चौथ्या सीझनचा फिनाले असून या सोहळ्याला अवघे काही तासंच शिल्लक राहिले आहेत. २ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या खेळाने कधी १०० दिवसांचा टप्पा पार केला, काही कळलंच नाही.

Apurva Nemlekar
Urfi Javed Vs Chitra Wagh: उर्फी जावेदच्या निशाण्यावर पुन्हा चित्रा वाघ, 'आता चित्रा वाघ गप्प का?'...

सोळा स्पर्धकांसह सुरु झालेल्या खेळात नंतर काही वाईल्ड कार्ड स्पर्धकांच्या एन्ट्रीने सर्वांचेच कमालीचे मनोरंजन झाले. त्यामुळे या पर्वात कोणता स्पर्धक विजयी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले. टॉप ५ च्या शर्यतीत अपूर्वा नेमळेकर ही एक तगडी स्पर्धक मानली जाते. त्यामुळे तिला जिंकवण्यासाठी मुंबईकरांनी जोरात तयारी केली आहे.

Apurva Nemlekar
Mumbai Mafia: पुन्हा एकदा प्रेक्षकांना 'मुंबईच्या माफिया'चा दरारा अनुभवता येणार

अपूर्वासाठी तिचे चाहते अक्षरश: मुंबईच्या रस्त्यावर उतरुन तिला समर्थन देत आहेत. मुंबईच्या अनेक नाक्या- नाक्यावर, गल्लीत कुठे बॅनर तर कुठे पोस्टर लावत समर्थन देत आहेत. सध्या ही पोस्टर गर्ल सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असून प्रचंड मतांनी अपूर्वाला विजयी करा अशी विनंती चाहते सर्वांनाच करत आहे. कठोर परिश्रम करत प्रत्येक खेळात बाजी मारत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बिग बॉसच्या मराठीच्या शेवटच्या आठवड्यात सर्वांच्या आधीच पोहोचली होती.

Apurva Nemlekar
Urfi Javed: उर्फीनं तर कहरच केला, 'जबरा' फॅनची इच्छा केली पूर्ण; बोल्ड व्हिडिओ शेअर केल्यानं सगळेच हैराण

तिकीट टू फिनाले मिळवत या सीझनमधील ती पहिली स्पर्धक होती जिने थेट टॉप फाइव्ह मध्ये आपली बाजी मारली. जो नडेल त्याला भिडेल अशी स्ट्रेटेजी डोक्यात ठेवत सर्वांसोबत अपूर्वा एकहाती भिडली. तिने केवळ राडाच घातला नाही तर मेघा, स्नेहलता यांच्याशी प्रेमाचे संबंधही जोपासले. अक्षयवर भावासारखं प्रेम केलं तर विकास आणि तिच्या मैत्रिणे प्रेक्षकांना वेड लावलं. अशी हर हुन्नरी अपूर्वा आता ट्रॉफी पासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळे तिला जिंकवण्यासाठी चाहते जोरदार प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com