
‘बिग बॉस’फेम सई लोकूर सध्या बरीच चर्चेत आहे. तिने गेल्या महिन्यामध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला असून नुकतंच तिने तिचं नाव ठेवलं आहे. त्यासोबतच सईने आपल्या गोंडस मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने सोशल मीडिया पोस्टवरून चाहत्यांना मुलीची पहिली झलक दाखवत, नाव सांगितलं आहे. तिच्या मुलीचे नाव ‘ताशी’ असं ठेवलं आहे. तिने बाळाचे पाय, अभिनेत्रीचा हात आणि तिच्या पतीचा हात असा फोटो तिने शेअर केला आहे. (Marathi Actress)
अभिनेत्री पोस्टमध्ये बोलते, “... आणि आज आम्ही एक महिन्याचे झालो. आमचे आनंद, आमचं गोंडस बाळ, आमची परी ताशी रॉय. माझी डार्लिंग आज एक महिन्याची झाली आहे. आई-बाबा तुझ्यावर जीवापाड प्रेम करीत आहेत. तू आम्हाला तुमचे पालक म्हणून निवडलंस आणि पालकत्वाचा विशेषाधिकार दिल्यास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. तू या जगातली खूप सुंदर गोष्ट आहेस. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होतो.” असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टला कॅप्शन दिले. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Social Media)
नुकतंच अभिनेत्रीने राजश्री मराठी या युट्यूब चॅनलसोबत संवाद साधला होता. यावेळी तिने आपल्या मुलीच्या नावाचा अर्थही सांगितला आहे. “मी लेक ‘ताशी’चं नाव आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी ठरवलं होतं. ‘समृद्धी’असा ताशीच्या नावाचा अर्थ होतो. मी तिर्थदीप लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सिक्कीमला गेलो होतो. तिकडे फिरत असताना मला ताशी View Point (व्ह्यू पॉइंट) दिसला होता. तेव्हाच मी माझ्या नवऱ्याला बोलले की, आपल्याला जर मुलगी झाली तर तिचं नाव आपण ‘ताशी’ ठेवायचं.” (Bigg Boss Marathi)
'खूप गोड नाव आहे', 'ब्यूटिफूल नाव, ताशी खूप सुंदर नाव आहे. तुला खूप खूप आशिर्वाद' असं म्हणत चाहत्यांनी सईच्या लेकीच्या नावाचे कौतुक केले आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.