Summary -
तान्या मित्तल सोशल मीडियावर ट्रोल
तान्यावर पर्सनल स्टाइलिस्टने केले गंभीर आरोप
बिग बॉसच्या घरात नेसलेल्या साडी आणि कपड्यांचे पैसे दिले नाही
तान्याच्या टीमकडून स्टाइलिशला धमकावण्याचा प्रयत्न
'बिग बॉस १९' च्या घरात सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या तान्या मित्तलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तान्या मित्तलवर पर्सनल स्टाइलिस्ट रिद्धिमा शर्माने गंभीर आरोप केले आहेत. तान्या मित्तलने बिग बॉसच्या घरामध्ये नेसलेल्या ८०० साड्यांचा एक रुपयाही दिला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तान्या मित्तल वादात सापडली आहे. यामुळे सोशल मीडियावर तान्या मित्तलवर नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
तान्या मित्तल ही बिग बॉस १९ या शोची तिसरी रनर-अप ठरली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तल अडचणीत सापडली असून तिची जोरदार चर्चा होत आहे. तान्या मित्तलची पर्सनल स्टाइलिस्ट रिद्धिमा शर्माने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने तान्याला अनेक महागड्या साड्या, कपडे आणि अॅक्सेसरीज पाठवल्या असल्याचे सांगितले. या सर्व गोष्टी तान्याने बिग बॉसच्या घरात घातल्या पण तिला याचा एक रुपयाही मिळाला नाही. रिद्धीमाने सांगितले की तिने स्वत: तान्याच्या सर्व कपड्यांच्या शिपिंगचा आणि पोर्टलचा खर्च दिला. ती गेल्या आठवड्यापासून तान्या आणि तिच्या टीमशी संपर्क करण्याचा प्रयत्न करते. पण याकडे दुर्लक्ष केले जात असून तिला धमकवले जात आहे.
रिद्धिमाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी नेहमीच तान्याला पाठिंबा दिला आहे. तिला महागडे कपडे पाठवले आहेत. तिला एक खास भेटवस्तू आणि पत्रही पाठवले आहे. पण तिने 'धन्यवाद' देखील म्हटले नाही. माझ्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तान्या मित्तलने बिग बॉसच्या घरात ८०० हून अधिक साड्या आणल्या होत्या. त्यापैकी बहुतेक साड्या मी पाठवल्या होत्या. तान्याच्या या वागवण्यामुळे मी कठीण परिस्थितीत अडकली आहे. कारण तान्याने कपड्यांचे पैसे न दिल्यामुळे मला आर्थिक दबावाचा सामना करावा लागत आहे. तान्याच्या टीमने फक्त पैसे दिले नाहीत तर मला धमकावले आहे.'
दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये साधेपणा आणि आध्यात्मिक प्रतिमेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या तान्या मित्तलवर तिच्या स्टाइलिस्टने आरोप केल्यानंतर आता सोशल मीडियावर तिच्यावर टीका केली जात आहे. नेटकरी तान्यावर संताप व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तान्याने रुद्धीमाने केलेल्या आरोपाचे उत्तर द्यावे अशी मागणी केली जात आहे. पण तान्या आणि तिच्या टीमकडून अद्याप काहीच उत्तर आले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.