Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

Bigg Boss 20 Captain : 'बिग बॉस २०'च्या घराला आपला पहिला कॅप्टन मिळाला आहे. कॅप्टन्सी टास्क दरम्यान घरात प्रचंड राडा पाहायला मिळाला.
Bigg Boss 20 Captain
Bigg Boss 20 SAAM TV
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात ४ सदस्य नॉमिनेट

कॅप्टन्सी टास्क दरम्यान घरात तुफान राडा

'बिग बॉस २०'चा पहिला कॅप्टन ठरला

लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस २०' मध्ये भांडणांना, लढाईला, मैत्रीला आणि वादाला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात चार सदस्य नॉमिनेट झाले आहे. तर 'बिग बॉस २०'च्या घराला आपला पहिला कॅप्टन देखील मिळाला आहे. बिग बॉसच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान राडा होताना दिसला. प्रेक्षक आता 'वीकेंड का वार'ची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

पहिला कॅप्टन कोण?

'बिग बॉस २०'ची माहिती देणाऱ्या अनेक सोशल मिडिया पेजेसनुसार, 'बिग बॉस २०'चा पहिला कॅप्टन यंग डीएसए बनला आहे. मात्र अद्याप बिग बॉसकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 'बिग बॉस २०'च्या प्रोमोच्या व्हायरल व्हिडीओत कॅप्टन्सी टास्कमध्ये शेवटी गुल्लू, आसिफ खान आणि यंग डीएसए यांच्यात स्पर्धा होताना पाहायला मिळाली. काझी आणि आसिफ यांच्यातील परिस्थिती चिघळू लागताच, सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले जाते. इतर स्पर्धक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तसेच कॅप्टन्सी टास्क दरम्यान काझी तौकीर आणि यंग डीएसए यांच्यात भांडणे होतात.

प्रोमोमध्ये फक्त घरातील सदस्य बिघडत चाललेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. स्पर्धकांमधील भांडणे हाणामारीपर्यंत पोहचताना दिसत आहेत. मात्र बिग बॉसच्या घरात शारीरिक हिंसाचाराला मनाई आहे. बिग बॉसने शारीरिक हिंसाचारासाठी स्पर्धकांना घरातून बाहेरही काढले आहे. काझी आणि आसिफ यांच्यातील भांडणांचा मुद्दा 'वीकेंड का वार' मध्ये नक्कीच पाहायला मिळेल.

Bigg Boss 20 Captain
Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

पहिल्या आठवड्यात कोण झाले नॉमिनेट?

  • लव गिल

  • अरिशफा खान

  • उदिती सिंह

  • कनिका मान

'बिग बॉस २०' मध्ये १६ स्पर्धक शोमध्ये सामील झाले आहेत. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com