'Bigg Boss 19'च्या घरात होणार मिड वीक एलिमिनेशन, ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Bigg Boss 19 - Mid Week Eviction : 'बिग बॉस 19'च्या घरात मिड वीक एव्हिक्शन होणार आहे. घरातील 4 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यांची नावे जाणून घेऊयात.
Bigg Boss 19 - Mid Week Eviction
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस 19'च्या घरातून जीशान कादरीची एक्झिट झाली आहे.

बिग बॉसने मिड वीक एव्हिक्शन जाहीर केले आहे.

घरातील 4 सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19 ) घरातून नुकतीच जीशान कादरीची एक्झिट झाली आहे. या आठवड्यात बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. घरात मिड वीक एव्हिक्शन होणार आहे. त्यासाठी घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. हा नॉमिनेशन टास्क खूपच रंजक पाहायला मिळाला. घरातील सदस्यांना जा लोकांना नॉमिनेट कारायचे आहे. त्यांना पाणीपुरी खाऊ घालायची होती.

'बिग बॉस 19'ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये मृदुल तिवारी फरहाना भट्टला पाणी पुरी खायला देतो. तर मालती चहर गौरव खन्नाला पाणी पुरी देते. त्यानंतर अमाल मलिक अभिषेक बजाजला पाणी पुरी खायला देतो. मात्र त्यातही अभिषेक बजाज आणि अमाल मलिकमध्ये भांडणे होतात. व्हिडीओच्या शेवटी घरातील सदस्यांमध्ये मोठे भांडण होताना दिसते. मृदुल तिवारी आणि मालती चहर एकमेकांना सुनावताना दिसतात.

शेवटी 'बिग बॉस 19' च्या घरातून 4 सदस्य घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यात मृदुल तिवारी, मालती चहर, गौरव खन्ना आणि नीलम गिरी यांचा समावेश आहे. नेहल या आठवड्याची कॅप्टन असल्यामुळे तिने फरहाना भट्टला नॉमिनेशपासून वाचवले. आता बिग बॉसमधून मिड वीक एव्हिक्शनमध्ये कोण जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नॉमिनेशन टास्कमध्ये अमाल मलिक आणि अभिषेक बजाज सोबत बसीर अली देखील भांडताना दिसत आहे. तसेच फरहाना भट्ट शाहबाज बदेशा आणि नीलम गिरी यांच्याशी भिडणार आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये तान्या मित्तल खूप शांत पाहायला मिळाली. आता कोण घरात राहणार आणि कोण घराबाहेर जाणार हे येणार काळात पाहायला मिळेल.

Bigg Boss 19 - Mid Week Eviction
वरुण धवनची 'No Entry 2'मधून एक्झिट, चित्रपटाचा नवा हिरो कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com