'नो एन्ट्री 2'मध्ये दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत होते.
'नो एन्ट्री 2'मधून आधी दिलजीत दोसांझने एक्झिट केली. त्यानंतर आता वरुण धवनने चित्रपट सोडला आहे.
'नो एन्ट्री 2' हा कॉमेडी चित्रपट असणार आहे.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) नुकताच 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपट रिलीज झाला आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे. यात वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत जान्हवी कपूर झळकली आहे. वरुण सध्या त्याचा आगामी चित्रपट 'नो एन्ट्री 2' मुळे (No Entry 2 ) चांगलाच चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वरुण धवनने 'नो एन्ट्री 2' मधून एक्झिट घेतली आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.
'नो एन्ट्री 2' चित्रपटात वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत काम करणार होते. मात्र सुरुवातीलाच दिलजीत दोसांझने चित्रपटातून एक्झिट घेतली आणि आता वरुणने देखील चित्रपट सोडला आहे. 2005 साली रिलीज झालेल्या 'नो एन्ट्री' चित्रपटाचा हा सीक्वल आहे. 'नो एन्ट्री 2' चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी आहेत.
'नो एन्ट्री 2' मध्ये वरुण धवन दिसणार नसल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, वरुण धवनचा आगामी चित्रपट 'भेडिया 2' देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे वरुण सध्या 'भेडिया 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'भेडिया 2' आणि 'नो एन्ट्री 2' या दोन्ही चित्रपटांच्या तारखा क्लॅश होत असल्यामुळे वरुण धवनने 'नो एन्ट्री 2' मधून एक्झिट घेतली आहे. मात्र अद्याप चित्रपटाचे निर्माते आणि वरुण धवनने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. तसेच आता चित्रपटात कोणते नवीन हिरो पाहायला मिळणार याचा अद्याप खुलासा झाला नाही.
वरुण धवनचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari ) चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे.'सनी संस्कारी' मध्ये वरुण धवनसोबत जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वरुण धवनचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाचे एकूण कलेक्शन 49.60 कोटी रुपये झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.