Bigg Boss 19 Trailer: ड्रामा क्रेजी नही डेमोक्रेसी होगी...; बिग बॉसच्या घरात होणार नवे बदल, स्पर्धकांना मिळणार खास संधी

Bigg Boss 19 Trailer: बिग बॉसचा ट्रेलर रिलीज झाला आहे ज्यामध्ये सलमान खान शोचे नवे बदल सांगताना दिसत आहे. बिग बॉस-१९ २४ ऑगस्ट २०२५ पासून प्रसारित होईल.
Bigg Boss 19 Trailer
Bigg Boss 19 TrailerSaam Tv
Published On

Bigg Boss 19 Trailer: बिग बॉसचा ट्रेलर रिलीज झाला आहे ज्यामध्ये सलमान खान शोचे नवे बदल सांगताना दिसत आहे.व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या गाडीमधून नेत्याच्या रूपात उतरताना दिसत आहे. त्यानंतर तो संसदेप्रमाणे दिसणाऱ्या हॉलमध्ये जातो. त्यावेळी सलमान खान म्हणतो, या बिग बॉसच्या घरात ड्रामा क्रेजी नहीं डेमोक्रेसी होगी. हे १८-१९ वर्षात पहिल्यांदाच घडणार आहे.

मग तो सांगतो की यावेळचा बिग बॉस इतर सीझनपेक्षा कसा वेगळा असेल. या ट्रेलरवरून हे स्पष्ट झाले आहे की यावेळीही सलमान खान बिग बॉस होस्ट करेल. आधी असा अंदाज लावला जात होता की हा शो दुसरा कोणीतरी सेलिब्रिटी शो होस्ट करू शकतो. यावेळी रिअॅलिटी शोमधील घरातील सदस्यांची थीम 'सरकार' असेल. बिग बॉसच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. यावेळी बिग बॉसचा हा सीझन खूप स्फोटक असणार आहे.

Bigg Boss 19 Trailer
The Trial 2: मी किती वेळा कमबॅक करू? 'द ट्रायल 2' ची घोषणा करताना का चिडली काजोल?

बिग बॉस १९ च्या या ट्रेलरवर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले, माझा आवडता शो आणि माझा आवडता होस्ट लवकरच येत आहे यासाठी मी खूप उत्सुक आहे. तर दुसऱ्याने लिहिले, भाई का स्वॅग. तर, आणखी एकाने लिहिले सलमान सर हॉस्ट करणार हे नक्की झालं आता स्पर्धक कोण असणार हे पाहण्याची इच्छा आहे.

Bigg Boss 19 Trailer
Sai Tamhankar: महाराष्ट्राने दिलेली ही शाबासकी आहे...; ११ वर्षांनी सई ताम्हणकरला मिळाला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार

नवीन सीझन कधी सुरू होईल?

ट्रेलरमध्ये सलमान खान म्हणतो, हाऊसमेट्स, यावेळी तुम्हाला जे काही करायचे ते करा. पण परिणामांसाठी आणि जनतेच्या निर्णयासाठी तयार राहा. कारण यावेळी बिग बॉसमध्ये हाऊसमेट्सचे सरकार असेल. हा ट्रेलर जिओ हॉटस्टारच्या यूट्यूब चॅनलवरून रिलीज करण्यात आला आहे. बिग बॉस-१९ २४ ऑगस्ट २०२५ पासून रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टारवर आणि रात्री १०.३० वाजता कलर्सवर प्रसारित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com