Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवालला 'बिग बॉस'ची ऑफर; शोमध्ये सहभागी होण्याची चर्चा

Bigg Boss 19: बिग बॉस १९’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या हिमांशी नारवालला शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे.
Big Boss 19
Big Boss 19Saam Tv
Published On

Bigg Boss 19: बिग बॉस १९’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांकडून अलीकडेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या हिमांशी नारवालला शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. या शोमध्ये खरचं हिमांशी नारवाल सहभागी होणार का त्याबद्दल जाणून घेऊयात.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार आणि हल्ला केला होता. या घटनेत अनेक जण जखमी झाले होते, त्यात हिमांशी नारवालने तिच्या पतीला गमावले. तसेच ती देखील गंभीर दुखापत झाली होती. तिच्या पायाला गंभीर इजा झाली होती.

Big Boss 19
War 2: वॉर २ मधून काढला कियारा अडवाणीचा बिकिनी सीन? चित्रपटाच्या रिलीजपूर्वी सीबीएफसीने केले मोठे बदल

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस १९’ चे मेकर्स हिमांशीची प्रेरणादायी कहाणी देशभरातील प्रेक्षकांसमोर आणू इच्छितात. तिचा कठीण प्रसंगातील संघर्ष, दाखवलेले धैर्य आणि जगण्याची जिद्द हे सर्व या शोमधून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, हिमांशीने या ऑफरला अद्याप संमती दिलेली नाही. सध्या ती शारीरिक आणि मानसिक उपचारांवर लक्ष केंद्रित करत आहे.

Big Boss 19
Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

या प्रस्तावाबाबत हिमांशीच्या कुटुंबीयांकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, चाहत्यांना तिचा शोमधील सहभाग प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जर ती शोमध्ये सहभागी झाली, तर तिच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासाची कहाणी लाखो लोकांपर्यंत पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com