Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

Box Office: बॉक्स ऑफिसवर चित्रपटांसाठी शनिवारचा दिवस चांगला ठरला. 'महावतार नरसिंह' पासून ते इतर चित्रपटांपर्यंतच्या कलेक्शनमध्येही वाढ झाली आहे.
Box office collection of mahavatar narsimha saiyaara dhadak 2 son of sardaar
Box office collection of mahavatar narsimha saiyaara dhadak 2 son of sardaar Saam Tv
Published On

Box Office: सध्या चित्रपटगृहांमध्ये वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये 'उदयपूर फाइल्स' आणि 'अंदाज २' पासून ते 'महावतार नरसिंह', 'धडक २' पर्यंतचे अनेक चित्रपट समावेश आहेत. परंतु 'महावतार नरसिंह' ने शर्यत जिंकली आणि कमाईच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे.

महावतार नरसिंह

'महावतार नरसिंह'ची जादू बॉक्स ऑफिसवर सुरूच आहे. शनिवारी या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आणि सर्व चित्रपटांना मागे टाकले. अश्विन कुमार दिग्दर्शित 'महावतार नरसिंह'ने शनिवारी १९.५० कोटी रुपये कमावले. दुसरीकडे, शुक्रवारी या चित्रपटाने ७.५० कोटी रुपये कमावले होते. आतापर्यंत या चित्रपटाने १६ दिवसांत १४५.१५ कोटी रुपये कमावले आहेत.

सैयारा

अहान पांडे आणि अनित पड्डा अभिनीत ' सैयारा'च्या कलेक्शनमध्ये शनिवारी पुन्हा वाढ झाली आहे. शनिवारी या चित्रपटाने ३.३५ कोटी रुपये कमावले, तर शुक्रवारी २ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने २३ दिवसांत ३१४.१० कोटी रुपये कमावले आहेत.

Box office collection of mahavatar narsimha saiyaara dhadak 2 son of sardaar
War 2: वॉर २ मधून काढला कियारा अडवाणीचा बिकिनी सीन? चित्रपटाच्या रिलीजपूर्वी सीबीएफसीने केले मोठे बदल

उदयपूर फाइल्स

विजय राज अभिनीत 'उदयपूर फाइल्स' हा चित्रपट अनेक दिवस न्यायालयीन वादानंतर शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये फक्त १३ लाख रुपयांपासून सुरुवात झाली. गेल्या शनिवारी, वृत्तांनुसार, चित्रपटाने फक्त १ लाख रुपयांची कमाई केली. या चित्रपटात कन्हैया लाल तेलकरची कथितपणे मोहम्मद रियाज आणि मोहम्मद गौस यांनी कशी हत्या केली हे दाखवले आहे.

अंदाज २

सुनील दर्शनचा 'अंदाज २' हा चित्रपट देखील शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यावेळी आयुष कुमार, कायशा आणि नताशा फर्नांडिस सारखे नवीन कलाकार चित्रपटात दिसले आहेत. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १२ लाख रुपये कमावले. शनिवारी चित्रपटाने १९ लाख रुपये कमावले. त्यानुसार, एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर 'अंदाज २' ने ३१ लाख रुपये कमावले आहेत. हा चित्रपट २००३ मध्ये आलेल्या 'अंदाज' चित्रपटाचा सिक्वेल आहे.

Box office collection of mahavatar narsimha saiyaara dhadak 2 son of sardaar
Coolie Movie: रजनीकांत यांच्या 'कुली'चा बोलबाला; प्रदर्शनापूर्वीच केलं अर्धे बजूट वसूल, ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा किती?

सन ऑफ सरदार २

अजय देवगण अभिनीत 'सन ऑफ सरदार २' च्या कमाईत शनिवारी वाढ झाली. शनिवारी चित्रपटाने ४ कोटी रुपये कमावले, तर शुक्रवारी १.२५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाने ९ दिवसांत एकूण ३८.२५ कोटी रुपये कमावले आहेत.

धडक २

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा 'धडक २' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन ९ दिवस झाले आहेत. गेल्या शनिवारी चित्रपटाने १.४० कोटी रुपये कमावले, तर शुक्रवारी फक्त ६० लाख रुपये कमावले. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १८.७० कोटी रुपये कमावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com