Bigg Boss 16: 'न भुतो..' अशी मैत्री दिसली बिग बॉसच्या घरात, वादग्रस्त घरातही खुलली शिव- MC स्टॅनची निखळ मैत्री

'बिग बॉस'च्या सोळाव्या सीझनमध्ये दोन पक्के मित्र एकमेकांच्या समोर विरोधी स्पर्धक म्हणून उभे ठाकले होते.
Bigg Boss 16 Fianle
Bigg Boss 16 FianleSaam Tv

MC Stan And Shiv Thakare Friendship: 'बिग बॉस १६' च्या विजेत्याची (Bigg Boss 16 Finalist) ची घोषणा होताच नक्कीच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 'बिग बॉस'च्या सोळाव्या सीझनचा विजेता MC स्टॅन ठरला आहे. या सीझनमध्ये दोन पक्के मित्र एकमेकांच्या समोर विरोधी स्पर्धक म्हणून उभे ठाकले होते. MC स्टॅन आणि शिव ठाकरे या दोघांमध्येही यावेळी चुरशीची लढत झाली होती. या दोघांच्याही मैत्रीची चर्चा सध्या सोशल मीडियावर बरीच होत आहे.

Bigg Boss 16 Fianle
Siddharth-Kiara Reception: सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमधील इनसाईड व्हिडिओ; जोडप्याचा भन्नाट डान्स पाहून चाहतेच काय सेलिब्रिटीही झाले अवाक

'बिग बॉस'च्या सोळाव्या सीझनमध्ये टॉप ५ मध्ये MC स्टॅन, शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, शालिन भनौत, अर्चना गौतम होते. यावेळी यांच्यात चांगलीच शेवटच्या क्षणापर्यंत चुरस रंगली होती. फायनलच्या शेवटी MC स्टॅन आणि शिव ठाकरे होते. पक्के मित्र शेवटी फक्त विरोधी स्पर्धक म्हणून उभे होते. या दोघांचीही मैत्री संपूर्ण सीझनमध्ये नेहमीच चर्चेत होती. विशेष म्हणजे या दोघांचीही मैत्री झाल्यापासून त्यांच्यात भांडण किंवा कोणताही वाद कधीच होताना आपण पाहिलेला नाही.

Bigg Boss 16 Fianle
Pathaan box office Day 19: 'पठान'चा बॉक्स ऑफिसवर डंका कायम, सलग तिसऱ्या आठवड्यातही कमाईत अव्वल

बिग बॉसच्या सुरुवातीलाच शिव आणि स्टेनमध्ये भांडण झाले होते. या भांडणात साजिद खानने मध्यस्थी केली होती. मात्र, यानंतर दोघांमध्ये अशी मैत्री निर्माण झाली, ज्यात लाखो चढ-उतार होऊनही कुठलाही दुरावा आला नाही. किंबहुना शिव अनेकदा स्टेनच्या समर्थनार्थ उभा दिसला. अर्चना गौतमच्या भांडणातही शिव स्टेनची ढाल बनून उभा होता. यांची मैत्री शेवटच्या एपिसोड पर्यंत कायम तशीच राहिली होती.

Bigg Boss 16 Fianle
Siddharth-Kiara Reception: सिद्धार्थ- कियाराच्या ग्रँड रिसेप्शनमध्ये बॉलिवूडची मांदियाळी, सेलेब्रिटींचा दिसला ग्लॅमरस अवतार

बिग बॉसच्या घरात अशी अनेक टास्क होते ज्यात या दोघांनाही समोरासमोर यावे लागले होते. असेच एक कार्य म्हणजे थेट प्रेक्षकांना कॅप्टनसाठी स्वतःला मत देण्यास सांगणे. यादरम्यान स्टेन स्टेजवर उभा रहात म्हणतो की, मी त्याच्या मित्रांविरुद्ध बोलणार नाही. शिवाला मते मिळाली तरी खूप आनंद होईल.

Bigg Boss 16 Fianle
Ved Movie: रितेश- जिनिलीयाची मोठी घोषणा, पोस्ट करत चाहत्यांना दिलं 'वॅलेंटाईन डे'निमित्त 'स्पेशल गिफ्ट'

साजिद खान शोमध्ये स्पर्धक म्हणून आला, तेव्हा त्याने शिव, स्टेन, सुंबूल तौकीर खान, अब्दुल रोजिक आणि निम्रत कौर यांच्यासोबत एक ग्रुप तयार केला होता. अनेक स्पर्धक सोडून गेले तरी, सर्वांची मैत्री तशीच आहे. एमसी स्टॅनची 'बिग बॉस १६'चा विजेता म्हणून घोषणा झाली तेव्हा, सर्वाधिक आनंद शिवला झाला होता. स्वत:ला स्टॅनचा सर्वात मोठा चाहता असल्याचे शिवने पत्रकार परिषदेत सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com