Amitabh Bachchan's Bike Ride: अनोळख्या व्यक्तीसोबत बिग बींची बाईक राईड, बाहेर आले अन् थेट...

बिग बींना आज शूटिंगसाठी पोहोचायला उशीर होत असल्यामुळे त्यांनी थेट बाहेर येताच फॅन्सच्या टू व्हिलरवर बसून शूटिंग स्पॉट गाठलं.
Amitabh Bachchan's Bike Ride
Amitabh Bachchan's Bike RideInstagram

Amitabh Bachchan's Bike Ride: बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर बिग बी अमिताभ बच्चन एका कारणामुळे कमालीचे चर्चेत आले आहेत. वेळेवर शूटिंग स्पॉटवर पोहोचता यावं यासाठी बिग बींनी थेट आपल्या एका चाहत्यासोबत बाईकवर बसून थेट शूटिंग स्पॉटच गाठलंय. यावेळी बिग बींनी त्याच्या फोटो काढून त्याला धन्यवाद म्हणत पोस्ट शेअर केली आहे.

Amitabh Bachchan's Bike Ride
HBD Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचे टॉप 10 चित्रपट; अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात निर्माण केलं स्थान

अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींनी शूटिंगला वेळ होतो यामुळे ते थेट पब्लिक ट्रान्सपोर्टचाच वापर करतात. यापूर्वी हेमा मालिनी, सारा अली खान, अनन्या पांडे सह अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अलिशान गाडीचा वापर न करत थेट पब्लिक ट्रान्सपोर्टचाच वापर केला आहे. सध्या बिग बी या मुद्द्यामुळे सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत आले आहे. बिग बींना आज शूटिंगसाठी पोहोचायला उशीर होत असल्यामुळे त्यांनी थेट बाहेर येताच फॅन्सच्या टू व्हिलरवर बसून शूटिंग स्पॉट गाठलं.

अमिताभ बच्चन वेळेसाठी खूपच पक्के आहेत. अशा स्थितीत मुंबईच्या ट्रॅफिकचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांनी हा रामबाण उपाय शोधला असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मुंबईकरांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही परिस्थितीत ट्रॅफिकचा सामना हा करावाच लागतो. बिग बींना चित्रपटाच्या शूटिंगसाठी उशिर होत असल्यानं त्यांनी थेट चाहत्याच्या बाईकवरूनच प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

बिग बींनी चाहत्याच्या गाडीवर फोटो काढत सोशल मीडियावर शेअर केला आहे, सोबतच त्याचे त्यांनी आभार देखील मानलेत. बिग बींनी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “धन्यवाद मित्रा बाईक राईडसाठी. तुला माहित नाही, पण तू मला माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलेस. मला कधीही न संपणाऱ्या ट्रॅफिक जॅमपासून वाचवल्याबद्दल धन्यावद.”

बिग बींच्या या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. सोबतच यावेळी त्यांची नात नाव्या नवेलीच्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधले, या पोस्टवर तिने हसण्याचे आणि रेड हार्ट इमोजी कमेंट केली आहे. एक चाहता म्हणतो, तुम्हाला खरंच वेळेचे महत्व आहे, त्यामुळे तुमचे जितके करावे कौतुक तितके कमी आहे. तुमचा आदर्श इंडस्ट्रितल्या अनेक सेलिब्रिटींनी घ्यावा तर काहींनी बिग बींनी हेल्मेट न घातल्यामुळे त्यांना ट्रोल केले.

Amitabh Bachchan's Bike Ride
Zara Hatke Zara Bachke मध्ये दिसणार सारा- विकी, पोस्टर प्रदर्शित...

बिग बी यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, बिग बी सध्या नाग अश्विनच्या 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरही ते जखमी झाला होते. अलीकडेच त्यांनी रिभू दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित 'सेक्शन 84' मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये डायना पेंटी, अभिषेक बॅनर्जी आणि निम्रत कौर दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com