Zara Hatke Zara Bachke मध्ये दिसणार सारा- विकी, पोस्टर प्रदर्शित...

विकी आणि साराच्या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर रविवारी सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून सध्या पोस्टरची चर्चा सुरू आहे.
Zara Hatke Zara Bachke Poster Out
Zara Hatke Zara Bachke Poster OutInstagram

Zara Hatke Zara Bachke Poster Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खानचा आगामी चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे. दरम्यान, विकी आणि साराच्या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर रविवारी सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे, त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'जरा हटके जरा बचके' असे असून सध्या पोस्टरची चर्चा सुरू आहे.

Zara Hatke Zara Bachke Poster Out
Bigg Boss Fame Celebrity Viral Video: 'बिग बॉस' फेम दादूस अडचणीत? हळदीच्या कार्यक्रमात केला हवेत गोळीबार, कारवाईची होतेय मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या आगामी चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नुकतंच यांच्या आगामी चित्रपटाचं समोर आलं असून दोघांचा ही क्यूट पोस्टर देखील प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमध्ये दोघांचाही लूक सध्या कमालीचा चर्चेत आहे. 'जरा हटके जरा बचके' असं चित्रपटाचं नाव असून दोघांनीही चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विकी कौशल आणि सारा चित्रपटात एकत्र दिसणार असून पोस्टरसोबत निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारिख देखील जाहीर केली आहे. येत्या २ जुनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे नाव 'लुका छुपी 2' असण्याची शक्यता आधी फॅन्सनी लावली होती, पण आता विक्की कौशलने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत चित्रपटाचे नाव 'जरा हटके जरा बचके' असे उघड केले आहे.

Zara Hatke Zara Bachke Poster Out
The Kerala Story Team Accident: हिंदू यात्रेत सहभागी होण्याआधी अदा शर्मासह 'द केरला स्टोरी' टीमचा अपघात

महत्वाची बाब म्हणजे, चित्रपटाचा ट्रेलर १५ मे ला अर्थात आज प्रदर्षित होणार आहे. विकी आणि साराने चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करत विकीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'रोमँटिक? किंवा ड्रामाटिक? तुम्हाला काय वाटतं, आमची स्टोरी कशी असेल?, विशेष म्हणजे हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com