Sudip Pandey Death: वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपटसृष्टीला मोठा धक्का! लोकप्रिय अभिनेत्याचं हर्ट अटॅकने निधन

Bhojpuri Actor Passed Away: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुदीप पांडेचे निधन झाले आहे. त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं निधन झालंय.
Sudip Pandey Death
Bhojpuri Actor Passed AwayYou Tube
Published On

भोजपुरी चित्रपटसृष्टीला वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसलाय. अभिनेता सुदीप पांडे याचं हर्ट अटॅकने निधन झालंय. सुदीप पांडेने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने चित्रपट निर्माता म्हणूनही काम केले आहे. तसेच त्याने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सुदीप पांडे याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. सुदीप हा राजकारणातही सक्रिय होता, तो एनसीपी पक्षाचा सदस्य होता.

Sudip Pandey Death
Box Office Collection : राम चरणचा गेम चेंजर १०० कोटींच्या क्लबमध्ये, पुष्पा भाऊची कमाई किती?

करिअरच्या सुरुवातीला तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. पण त्यानंतर त्याने २००७ मध्ये भोजपुरी भैया या चित्रपटातून त्याने आपल्या भोजपुरी फिल्मी करिअरला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार सुदीप पांडे यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी सुदीप पांडे त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते, असेही सांगण्यात येत आहे.

Sudip Pandey Death
Urvashi Rautela: नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबतच्या डान्स स्टेप्ससाठी उर्वशी ट्रोल, स्पष्टीकरणात मोठं वक्तव्य, म्हणाली...

त्याच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सुदीप पांडेने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यादरम्यान त्याने यूएसएमध्ये कामही केले. अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर त्याने भोजपुरी भैया नावाचा चित्रपट बनवला. या चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका होती. त्याने या चित्रपटाची निर्मितीही केली होती. यानंतर अभिनेता सुदीप पांडेने अनेक चित्रपटात काम केले. एक वेळ आली जेव्हा तो भोजपुरी सिनेमाचा लोकप्रिय कलाकार बनला होता.

राजकारणात येण्यापूर्वी सुदीपने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले होते. काही हिंदी चित्रपटांतही त्याने काम केले आहे. भोजपुरिया दरोगा, मसीहा बाबू, सौतन, नथुनिया पे गोली मारे, हमर संगी बजरंगबली, हम हैं धर्मयोद्धा, खूनी दंगल, धरती का बेटा, जीना सिरफ तेरे लिए, बागवत, जय हो जगदंबा मै आणि हमर लालकर या चित्रपटात त्याने काम केले आहे.

सुदीप पांडेला बिहार टुरिझमचा ब्रँड ॲम्बेसेडरही बनवण्यात आले आहे. याच काळात त्याने बिहार एक खोज नावाची टीव्ही मालिका प्रदर्शित केली. चित्रपटांव्यतिरिक्त ते टीव्हीच्या जगाशीही जोडला गेला होता आपल्या कारकिर्दीत त्याने सात वचन सात फेरे, कहीं का हाल बा, पोलिस फाइल्ससह अनेक मालिकांमध्ये काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com