प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात मृत्यू
ट्रकची बाईकला जोरदार धडक
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोजपुरी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक रोहित शर्मा यांचे भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवार (२१ जुलै) रोजी सकाळी एका भीषण अपघातात अभिनेत्याचे निधन झाले. अभिनेत्याच्या अशा अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
'दैनिक भास्कर' ने दिलेल्या वृत्तानुसार, रस्त्याच्या चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने बाईक चालवत असलेल्या रोहित शर्मा यांना चिरडले. अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रोहित शर्मा यांच्यासोबत बाईकवर असलेला त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अभिनेता रोहित शर्माच्या भावाने 'दैनिक भास्कर'दैला सांगितले की, रोहित शर्मा सोमवार, २० जुलै रोजी संध्याकाळी एका भोजपुरी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मालिहाबादला गेले होते. त्यांचा मित्रही त्यांच्यासोबत होता. मात्र, मंगळवारी पहाटे ते बाईकवरून परत येत असताना, चुकीच्या बाजूने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली आणि त्यांना चिरडले. गुडंबा रिंग रोडवरील टीव्हीएस शोरूमसमोर ट्रकने डिव्हायडर तोडला होता आणि तो चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने येत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की रोहित शर्माचे हेल्मेट फुटले आणि त्याला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. ट्रक चालक घटनास्थळावरून तात्काळ पळून गेला. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा रोहित शर्मा आणि त्याच्या मित्राला गंभीर अवस्थेत होते. त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रोहित शर्माचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मित्र, शोभित, उपचार घेत असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा नंबर ओळखण्यात आला असून चालकाला लवकरच अटक करण्यात येईल. मंगळवारी रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर रोहित शर्माचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. रोहित शर्माच्या मृत्यूने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. चाहते आणि कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.