'भाभी जी घर पर है' मालिकेतील कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर

'भाभी जी घर पर है' मालिकेतील डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता जितू गुप्ताच्या मुलाचे निधन झाले आहे. कॉमेडियन सुनील पालने ही माहिती दिली आहे.
Jitu Gupta Son
Jitu Gupta Son Saam Tv
Published On

मुंबई: दोन महिन्यांपूर्वी टीव्ही अभिनेता दिपेश भानने जगाचा निरोप घेतला. 'भाभी जी घर पर है' मध्ये तो मलखानची भूमिका साकारत होता. त्याच्या अचानक एक्झिटने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता या शो संबंधित आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता जितू गुप्ताच्या मुलाचे निधन झाले आहे. कॉमेडियन सुनील पालने ही माहिती दिली आहे.

Jitu Gupta Son
Ekta Kapoor | एकता कपूरविरोधात अटक वॉरंट जारी; २०२० मधील नेमकं काय आहे प्रकरण?

'भाभी जी घर पर है' मधील अभिनेता जितू गुप्ताच्या मुलाचे नाव आयुष होते. तो १९ वर्षांचा होता. सुनील पालने अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, जीतू गुप्ताचा मुलगा आता आपल्यासोबत नाही. आयुषच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थनाही केली. जीतू गुप्ताने त्याच्या मुलाचा फोटो फेसबुकवर शेअर करत लिहिले की, माझा बाबू आयुष आता आपल्यात राहिला नाही, असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. याआधीही त्याने हॉस्पिटलमधील मुलाचा फोटो शेअर केला होता. त्याला पाहून त्याच्या मुलाची प्रकृती किती नाजूक आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

Jitu Gupta Son
Happy Birthday Ranbir Kapoor: 250 रुपयांपासून करिअरची सुरुवात, आज एका सिनेमासाठी घेतो एवढे कोटी रुपये

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाचा फोटो जीतूने पोस्ट केला होता. मुलगा आयुषबद्दलची पोस्ट वाचल्यानंतर, तुम्ही सर्वजण त्याच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी वारंवार फोन करीत आहेत. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, फक्त तुमचे आशीर्वाद आणि देवाकडे प्रार्थना करा. कारण यावेळी त्याची प्रकृती खूपच चिंताजनक आहे. मी अजिबात बोलण्याच्या मन:स्थितीत नाही आणि एकाच वेळी इतक्या जणांसोबत बोलणे अशक्य आहे, असे त्याने सांगितले होते.

Jitu Gupta Son
... तेव्हा हिंदुस्थान मात्र चमकत होता; विक्रमच्या भाषणाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

मुलाची प्रकृती खालावल्याची माहितीसोबत जीतूने आणखी एक पोस्ट केली होती. त्यामध्ये लिहीले होते की, 'माझा मुलगा व्हेंटिलेटरवर आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कृपया माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. यानंतर, अनेकांनी कमेंट केल्या होत्या. तो लवकर बरा व्हावा, असे चाहते कमेंटमधून म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com