... तेव्हा हिंदुस्थान मात्र चमकत होता; विक्रमच्या भाषणाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

'पोन्नियिन सेल्वन १'ची संपूर्ण टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.
Ponniyin Selvan 1
Ponniyin Selvan 1Saam Tv

मुंबई: टॉलिवूडचा हिरो चियान विक्रम अभिनीत ‘पोन्नियिन सेल्वन १’(Ponniyin Selvan 1) या चित्रपटाच्या सर्वच प्रतीक्षेत आहेत. चित्रपटाचा पहिला भाग शुक्रवारी रीलीज होणार आहे. अलीकडेच चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांना प्रभावित केले आहे. सोशल मीडियावर(Social Media) सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशन दरम्यानच्या चियान विक्रमच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ponniyin Selvan 1
Richa Ali Wedding: रिचा-अलीचे ऐतिहासिक स्थळी होणार लग्न; अनेक ऐतिहासिक गोष्टींनी चाहत्यांचे वेधले लक्ष

'पोन्नियिन सेल्वन १'ची संपूर्ण टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. मुंबईत प्रमोशन दरम्यान एका कार्यक्रमात चियान विक्रमने त्याचे मत व्यक्त केले. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विक्रम त्याच्या भाषणात, चोल साम्राज्य आणि त्या साम्राज्यातील राजांच्या गौरवशाली इतिहासावर व्यक्त झाला आहे. यावेळेस त्याने म्हटले की, जेव्हा इंग्लंड आणि इतर देश आंधारात बुडाले होते, तेव्हा हिंदुस्थान मात्र चमकत होता. यासह तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराचा उल्लेख केला आहे.

Ponniyin Selvan 1
Alia-Ranbeer: असाच नवरा हवा गं बाई, रणबीर-आलियाच्या व्हिडीओने प्रेषकांचे मन पुन्हा जिंकले

'आपण सगळे इजिप्तला पिरॅमिड पाहण्यासाठी जातो, पिसाचा झुकलेला मिनार बघायला जातो. आंनदी होतो, आपण अशा इमारतींची प्रशंसा करतो. जी सरळ उभी नसून झुकलेली आहे. तिथे जाऊन सेल्फी घ्यायला उत्सुक असतो. परंतु आजही आपल्या भारतात अनेक पुरातन मंदिरे आहेत. जी आजही भक्कमपणे उभी आहेत, त्यांना उभारताना प्लास्टरचा वापर केलेला नाही,' असं तो म्हणाला.

Ponniyin Selvan 1
S.S.Rajamaouli: 'RRR' ची भूरळ हॉलिवूडलाही; दिग्दर्शक म्हणला, दाक्षिणात्य चित्रपटसारखी कलाकृती...

विक्रमने भाषणात ज्या मंदिराचा उल्लेख केला आहे. ते तंजावर येथील वृहदेश्वरचे मंदिर आहे, ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. ग्रॅनाइटने बनलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. तामिळ आर्किटेक्टरचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे मंदिर ओळखले जाते.

विक्रम म्हणाला की, 'या एका विशिष्ट दगडाचा राजाने रॅम्प तयार केला होता, जो ६ किलोमीटर लांब होता. या दगडाला ओढण्यासाठी बैल, हत्ती आणि माणसांचा वापर करण्यात आला होता. ६ किलोमीटर उंचावर नेण्यासाठी कोणतीही क्रेन किंवा मशीन वापरण्यात आली नव्हती. त्यावर कोणतेही प्लास्टर करण्यात आले नव्हते, तरीही या दगडाने ६ भूकंप झेलले आहेत. आपल्याला माहीतच आहे, ज्यावेळेस भूकंप होतो तेव्हा काय होते. त्यांनी काय सहन केलं. मात्र नंतर बाहेरून एक भिंत उभारली. त्याच्या आतल्या बाजूने ६ फूट लांब असा ओपन कॉरिडॉर बनवला, ओपन कॉरिडॉर आणि आतून अजून एक बांधकाम केले. त्यामुळे ते भूकंपाचे धक्के सहन करू शकला, आणि म्हणून तो इतकी वर्षे कायम आहे. हा आजवरचा इतिहास माहीत असायला हवा, असंही तो म्हणाला.

विक्रम पुढे म्हणाला, आपल्याला मिळालेला हा वारसा आपण चित्रपटात उतरवला पाहिजे आणि त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. 'आपल्या संस्कृतीचा विचार करा, इंग्लंड किती सुंदर आहे, त्यावेळी इंग्लंडवर व्हायकिंग हल्ले करत होता आणि ९ व्य शतकात युरोमध्ये डार्क ऐज होते, तिथे काहीच सुरु नव्हते. तर तुम्हाला वाटत नाही आपण हा इतिहास सेलेब्रेट करायला हवा?'

Ponniyin Selvan 1
Viral Meams: युट्यूबर्सला मुख्यमत्र्यांवर मीम्स बनवणे पडले महागात; अनेक युट्यूबरचे धाबे दणाणले

'पोन्नियिन सेल्वन १' ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात विक्रमसह ऐश्वर्या रे बच्चन, कार्थी, जयम रवी, त्रिशा आणि प्रकाश राज सारखे मोठमोठे कलाकार आहेत. तामिळमध्ये बनलेला हा चित्रपट हिंदी, तेलगू, कन्नड, आणि मल्याळममध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com