S.S.Rajamaouli: 'RRR' ची भूरळ हॉलिवूडलाही; दिग्दर्शक म्हणला, दाक्षिणात्य चित्रपटसारखी कलाकृती...

नुकतेच एका मुलाखतीत हॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक डॅनी डेवीतो याने भारतीय चित्रपटाची प्रशंसा केली असून त्याने आर.आर.आर चित्रपट पाहिला आणि तो त्याच्या पसंतीसही आला.
RRR Movie Poster
RRR Movie Poster Saam Tv
Published On

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपट (Tollywood Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवत आहेत. हा गल्ला त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी एक ऊर्जा देत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला एस. एस. राजामौली दिग्दर्शित आरआरआर (RRR) चित्रपटाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. राजामौलीने दिग्दर्शित केलेला एक चित्रपट म्हणजे बाहूबली. बाहूबली चित्रपटाने देशासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलाच धुमाकुळ घातला होता. मुख्य बाब अशी की, अमेरिकेतील (America) जनतेसोबतच बड्या सेलिब्रिंटीनीही चित्रपटाची प्रशंसा केली.

RRR Movie Poster
Viral Meams: युट्यूबर्सला मुख्यमत्र्यांवर मीम्स बनवणे पडले महागात; अनेक युट्यूबरचे धाबे दणाणले

दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही चित्रपटाला ऑस्कर मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती. नुकतेच एका मुलाखतीत हॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक डॅनी डेवीतो (Danny DeVito) याने भारतीय चित्रपटाची प्रशंसा केली होती. त्याने नुकताच एस.एस.राजामौली दिग्दर्शित आर.आर.आर चित्रपट पाहिला आणि तो त्याच्या पसंतीस आला. चित्रपट पाहाताच तो भारावून गेला होता. त्याच्यासोबत त्याच्या लेकीलाही आर.आर.आर चित्रपटाने भूरळ घातली आहे.

RRR Movie Poster
Ravi kishan: खासदार रवी किशन यांची ३ कोटींची फसवणूक, बिल्डरवर गुन्हा दाखल

चित्रपटासंबंधीत हॉलिवूड अभिनेता डॅनी डेवितो सांगतो, " मी आधीपासूनच बॉलिवूडमधील चित्रपट आवर्जुन पाहतो. नुकताच आर.आर.आर चित्रपट पाहिला आणि चित्रपटाने माझ्यासोबतच माझ्या मुलीवरही चित्रपटाने भूरळ घातली आहे. बॉलिवूडचे आकर्षण मला चित्रपटांच्या कथेमुळे अधिक आहे. आर.आर.आर चित्रपटाची कथा युद्धासोबतच गाण्याच्या माध्यमातूनही पुढे जाते. बॉलिवूड चित्रपटासारखे आपणही काहीतरी नवीन अनुभवायला हवे."

RRR Movie Poster
Deepika Padukone |अभिनेत्री दीपिका पदुकोण रूग्णालयात; नेमकं झालं तरी काय?

हॉलिवूड आर.आर.आर चित्रपटाच्या चांगलेच प्रेमात पडले आहे. चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण हे दाक्षिणात्य चित्रपटातले सुपरस्टार दिसले होते. सोबतच बॉलिवूडचे आलिया भट्ट, अजय देवगण आणि मकरंद देशपांडे असे काही नावाजलेले कलाकार एकाच फ्रेममध्ये दिसले होते. आर.आर.आर चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षक पाहू शकता.

Edit By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com