Ekta Kapoor | एकता कपूरविरोधात अटक वॉरंट जारी; २०२० मधील नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेत्री एकता कपूर आणि शोभा कपूर अडचणीत सापडल्या आहेत.
Ekta Kapoor News
Ekta Kapoor NewsSaam Tv

मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतील क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor)आणि आई शोभा कपूर(Shobha Kapoor) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री एकता कपूर आणि शोभा कपूर अडचणीत सापडल्या आहेत. माहितीनुसार, वेब सीरिजमधील आक्षेपार्ह सीनमुळे बिहार न्यायालयाने एकता कपूरसह आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

Ekta Kapoor News
Happy Birthday Ranbir Kapoor: 250 रुपयांपासून करिअरची सुरुवात, आज एका सिनेमासाठी घेतो एवढे कोटी रुपये

मिळालेल्या माहितीनुसार, वेबसीरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पात्रांबाबत २०२० मध्ये बेगसुराय न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. एकता कपूरच्या 'ट्रिपल एक्स' वेबसीरीजच्या सीझन २ मध्ये सैनिकांच्या पत्नींविषयी आक्षेपार्ह सीन दाखवण्यात आले होते. सैनिकांच्या पत्नीचा अपमान केल्याप्रकरणी माजी सैनिक शंभू कुमार यांनी सीजीएम न्यायालयात तक्रार केली होती. बेगुसराय न्यायालयाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना समन्स बजावले होते आणि हजर होण्याचे आदेशात म्हटले होते.

Ekta Kapoor News
... तेव्हा हिंदुस्थान मात्र चमकत होता; विक्रमच्या भाषणाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

माहितीनुसार, एकता कपूरनेही या प्रकरणावर तिचे स्पष्टीकरण दिले होते. तिने सांगितले होते की, या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी वेब सीरीजमधून हा सीन लगेच काढून टाकला. यासह एकताने आपली चूक मान्य करत माफीही मागितली.

या प्रकरणाची माहिती सेवानिवृत्त सैनिक शंभू कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शंभू कुमार म्हणाले, भारतीय सैनिक स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाची सेवा करतात. अशा स्थितीत त्यांच्याकडे आदराने बघितले पाहिजे, पण इथे मात्र उलटेच घडत आहे. मालिकेत भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीविषयी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com