Puja Birari: बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचे केळवण थेट सेटवर, ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या फॅमिलीचा फोटो तुफान व्हायरल

Kelvan Ceremony: ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारीचे केळवण थेट सेटवर मोठ्या उत्साहात पार पडले. बांदेकर कुटुंबाची होणारी सून असलेल्या पूजाचे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Viral Marathi Celebrity Wedding Photos
Puja Birari Kelvangoogle
Published On
Summary
  • पूजा बिरारीचे केळवण ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या सेटवर करण्यात आले.

  • मालिकेतील सर्व कलाकार आणि टीम सदस्य पूजाच्या केळवणासाठी उपस्थित होते.

  • आदेश बांदेकर यांच्या घरची होणारी सून असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

महाराष्ट्र असो वा परदेश एखाद्या कलाकाराची काही बातमी आली तर सगळेच चाहते फार उत्सूक होतात. सध्या लगीन सराईचा हंगाम सुरु असताना. काही मराठी कलाकारांच्याही लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत. त्यामध्ये ‘येड लागलं प्रेमाचं’या मालिकेमधली मंजिरी म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारी ही लवकरत बोहल्यावर चढणार आहे.

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी, अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरची होणारी सून पूजा बिरारीने नुकत्याच काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये पूजाच्या केळवणाचे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. हे फोटो कोणाच्या घरी नसून थेट मालिकेच्या सेटवर केले आहे.

Viral Marathi Celebrity Wedding Photos
S. L. Bhyrappa Death : सुप्रसिद्ध लेखकाचं बेंगळुरुत निधन; हृदयरोगाशी झुंज ठरली अपयशी

येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने पूजाचे मोठ्या धाटात केळवण केले. यावेळी मालिकेतील सर्व कलकार तिथे हजर होते. जमलेल्या टीमने पूजाला गिफ्ट्स देऊन तिचे केळवण पूर्ण केले. पुजाने सुंदर साडीत केळवणाचे फोटो शेअर केले. त्याचवेळेस सोशल मिडीयावर पुन्हा एकदा हीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या.

बांदेकरांचा मुलगा सोहम याची सुद्धा सोशल मिडीयावर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. या आधी बांदेकरांच्या घरात गणपतीच्या वेळेस पूजा दिसली होती. त्यावरू या नव्या जोडप्यांने चाहत्यांचे लक्ष वेधले. सोहमला अनेक प्रश्न विचारले गेले होते. मात्र यावर कोणतीच प्रतिक्रीया याने दिली नव्हती. अनेकांनी पुर्वी पूजा आणि सोहमला लग्नाविषयी प्रश्न विचारले होते. मात्र यांनी आता स्वत: हून लग्नाचे कबूल केले आहे.

सुरुवातीला सोहम बांदेकरचे केळवण मावशीने म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या जवळच्या मैत्रिणीने केले. त्यानंतर पूजाचे केळवण मालिकेच्या सेटवर करण्यात आले. याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर होत आहे.

Viral Marathi Celebrity Wedding Photos
Heart Care Tips: हातांच्या मुद्रांमध्ये दडलाय 'हार्ट'चा उपचार? योगा एक्सपर्ट सांगतात रोज करा या ३ सोप्या मुद्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com