Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक चढणार बोहल्यावर; मराठी कलाकारांनी केलं सोहमचं केळवण, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोहमच्या केळवणाचा व्हिडिओ सोशल मीडीयवर व्हायरल झाला आहे.
Aadesh Bandekar Son
Aadesh Bandekar SonSaam Tv
Published On

Aadesh Bandekar Son: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कपल अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखले जाणारे आदेश बांदेकर नेहमीच आपल्या सांस्कृतिक, सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतात. त्यांचा मुलगा सोहमने देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याने ‘ललित 205’ या मालिकेची निर्मिती केली तसेच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे की सोहमचा विवाह लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारीसोबत होणार आहे. पूजा बिरारी ही मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत तिने मंजिरी ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Aadesh Bandekar Son
Actress Oops Moment: 'द फॅमिली मॅन ३' फेम अभिनेत्रीचा इव्हेंटमध्ये तोल गेला; पायऱ्यांवरून उतरताना पडली अन्..., VIDEO व्हायरल

राजश्री मराठीने आता सोहमच्या केळवणाचा एक खास व्हिडिओ सोशल मीडीयवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्यासह सोहमला अभिनेत्री सुकन्या मोने, पूर्वा गोखले, शिल्पा नवलकर आणि अभिजीत केळकर यांनी मिळून सोहमचं औक्षण केलं आणि सुचित्राने सोहमला मुंडावळ्या बांधल्या.

Aadesh Bandekar Son
Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

सोहम आणि पूजाच्या लग्नाच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी मनोरंजनविश्वातील दोन लोकप्रिय कलाकार विवाहबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता सोहम आणि पूजा यांच्याकडून त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची सर्वजण वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com