कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ''बाळूमामाच्या नावानं चांगभलं'ला (Balumamachya Navan Changbhala) प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुमित पुसावळे घराघरामध्ये पोहचला असून या मालिकेमुळेच त्याला खरी ओळख मिळाली. या मालिकेमध्ये बाळूमामांची भूमिका त्याने साकारली. सुमित पुसावळेच्या आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का देणारी बातमी आहे. कारण सुमित पुसावळेने (Sumeet Pusavale) या मालिकेतून अचानक एक्झिट घेतली आहे. सुमित पुसावळेने अचानक मालिका सोडल्यामुळे सर्वांना धक्का बसला. पण त्याने असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर सुमितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट लिहिली. या पोस्टसोबत सुमीतने एक फोटो शेअर केला आहे. या फोटमध्ये बाळूमामांची कोल्हापूरी चप्पल, फेटा, काठी आणि त्यांची खाट, घोंगडी दिसत आहे. या पोस्टमध्ये सुमितने असे लिहिले आहे की, 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं... नमस्कार, मी सुमित पुसावळे, खरं तर ही ओळख 'बाळुमामा' ह्या नावा व्यतिरिक्त लगेच नाही होत आणि त्याच कारण तर तुम्हाला माहिती आहेच. बोलण्यासारखं, लिहण्यासारख खूप काही आहे.'
सुमितने पुढे असे लिहिले की, 'आजही बाळूमामाच्या नावानं चांगभलं सिरिअलच्या सेटवरचा योगायोगाने गेलो होतो तो दिवस आठवतोय. योगायोगाने आणि पुढच्या काही दिवसांतच बाळूमामांच्या रोलसाठी बोलावणं आलं आणि माझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरु झालं. बाळूमामांच्या सेवेत रुजू झालो. सगळ्यातआधी ह्या मालिकेचे निर्माते श्री. संतोष अयाचित सर @santoshayachit यांचे मनापासून आभार. मला, सुमित पुसावळेला एक वेगळी ओळख दिली. ही ओळख आयुष्यभरासाठी राहील असं काम माझ्याकडून करून घेतलंत.'निखिल साने सर, दीपक राजध्यक्ष सर, विराज राजे सर, केदार शिंदे सर.'
या पोस्टमध्ये सुमितने कलर्स मराठीची टीम, मालिकेच्या सेटवरील सर्व कर्मचारी, कलाकार यांचे आभार मानले आहेत. यासोबतच 'मायबाप प्रेक्षकांनो तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार. आजवर मला बाळूमामा म्हणून खूप प्रेम दिलंत, खूप साथ दिलीत, मला त्या रोलमध्ये स्वीकारलं, माझ्यावर विश्वास ठेवलात अशीच साथ तुम्ही यापुढे ही द्या, असाच विश्वास माझ्यावर ठेवा, आणि असंच प्रेम माझ्यावर अन् माझ्या कामावर करा.' असं म्हणत त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्याने 'लवकरच भेटूयात. जाता जाता एवढंच म्हणेन. बोला बोला बाळूमामामाच्या नावानं चांगभलं.', असं लिहिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.