Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाच्या 2025 ची सुरुवात 'थामा' च्या शूटिंगने; यावर्षी झळकणार 'या' चित्रपटांमधून

Ayushmann Khurrana Movie : आयुष्मान खुराना 2025 च्या सुरुवातीलाच थामा या त्याच्या आगामी चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलच्या शूटसाठी दिल्लीला रवाना झाला आहे.
Ayushmann Khurrana
Ayushmann KhurranaSaam Tv
Published On

Ayushmann Khurrana : नवीन वर्षाची सुरुवात होताच आयुष्मान खुरानाने 2025 साठी व्यस्त झालाआहे. तो त्याच्या बहुप्रतिक्षित थामा च्या दुसऱ्या शेड्यूलसाठी दिल्लीला रवाना झाला आहे. मॅडॉक फिल्म्सच्या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील थामा या चित्रपटाचा छोटा शेड्यूल मागील वर्षी मुंबईत पूर्ण झाला होता. आता या आठवड्यापासून राजधानी दिल्लीमध्ये काही रोमांचक सीन्स शूट केले जाणार आहेत, ज्याची शूटिंग जानेवारीच्या फर्स्ट हाफपर्यंत चालणार आहे.

थामा ही एक आकर्षक प्रेमकथा आहे, जी एका रक्तरंजित पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत, तर परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लॉकबस्टर मुंजा फेम आदित्य सर्पोतदार यांनी केले आहे. निरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फुलारा यांनी कथा लिहिली असून, दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Ayushmann Khurrana
Subodh Bhave : सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' नंतर 'देवमाणूस' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

2025 हे आयुष्मान खुरानासाठी खूप व्यस्त असणार आहे. थामा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, धर्मा आणि सिख्या प्रोडक्शन्सच्या अंतर्गत बनत असलेला एक अनटाइटल्ड अ‍ॅक्शन थ्रिलरमध्येही तो झळकणार आहे. एवढंच नाही, तर आयुष्मान लवकरच दोन नवीन प्रकल्पांना सुरुवात करणार आहेत. एक सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली एक हृदयस्पर्शी कौटुंबिक कथा, आणि दुसरी यशराज फिल्म्स व पोषम पा पिक्चर्सच्या सहकार्याने तयार होणारी रोमांचक थिएट्रिकल, ज्याचं दिग्दर्शन समीर सक्सेना करतील.

Ayushmann Khurrana
YJHD Box office Collection : रणबीर-दीपिकाची जादू, रि-रिलीज झालेल्या चित्रपटाची कमाई कोट्यवधींमध्ये, प्रेक्षकांची तुफान गर्दी

आयुष्मान खुरानाची समर्पण भावना आणि विविधतापूर्ण चित्रपट निवड पुन्हा एकदा सिद्ध करते की तो बॉलिवूडमधील सर्वांत बहुप्रतिक्षित आणि बहुगुणी सुपरस्टार्सपैकी एक आहे. 2025 हे निश्चितच त्याच्या चाहत्यांसाठी आणि इंडस्ट्रीसाठी लक्षवेधी वर्ष ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com