
Yeh Jawaani Hai Deewani Box office Collection : 'ये जवानी है दिवानी'च्या रि-रिलीजने चित्रपटगृहांमध्ये अशी जादू निर्माण केली की लोक पुन्हा त्याच उत्साहाने चित्रपट पाहायला जात आहेत. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा हिट चित्रपट 'ये जवानी है दिवानी' (YJHD) 2024 मध्ये पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि त्यामुळे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. यावेळीही तोच जुना रोमान्स आणि जादू पाहण्यासाठी चित्रपटगृहात चाहत्यांची झुंबड उडाली होती.
'ये जवानी है दिवानी' पुन्हा रिलीज होताच सिनेमा हॉलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओंमध्ये लोक बदतमीज दिल सारख्या गाण्यांवर नाचताना आणि चित्रपटातील अविस्मरणीय दृश्यांवर हुटिंग करताना दिसत आहेत. क्रिकेटचा सामना पाहत असल्यासारखे वातावरण प्रेक्षकांनी निर्माण केले. चित्रपटाने सुमारे 1.20 कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे बॉलीवूड चित्रपटाच्या रि-रिलीजसाठी ही सर्वात मोठी ओपनिंग आहे.
YJHD ओपनिंग आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन
अनेक व्यापार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की रणबीर कपूरचा 'ये जवानी है दिवानी'ला आजपर्यंत पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वात मोठी ओपनिंग मिळेल. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही उत्तम असण्याची अपेक्षा आहे. 2013 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याने 189 कोटींची कमाई केली होती आणि आता तो 200 कोटींचा टप्पा सहज पार करू शकतो.
'ये जवानी है दिवानी' पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित केला असून या चित्रपटाला भरगोस प्रतिसाद मिळत आहे. 'ये जवानी है दिवानी'ची जादू आजही लोकांच्या मनात घर करून आहे, तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की हा चित्रपट लवकरच २०० कोटींचा टप्पा पार करून नवीन रेकॉर्ड स्थापित करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.