Avkarika Marathi Movie
Avkarika Marathi MovieSaam Tv

Avkarika: स्वच्छता दूताची हृदयस्पर्शी कहाणी; 'अवकारीका' चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित

Avkarika Marathi Movie: एक स्वच्छता दूताची कथा आगामी 'अवकारीका' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांनी केले आहे.
Published on

Avkarika: स्वच्छ, देखण्या, निरोगी भारताची, पृथ्वी लख्ख करणारा दूत अशा टॅगलाईनसह प्रदर्शित झालेल्या 'अवकारीका' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसतंय. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.

स्वच्छतेच्या माध्यमातून स्वतःच्या जगण्याचा रस्ता शोधणाऱ्या वेदनेचा हा शोध असला तरी समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेची प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून 'अवकारीका’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Avkarika Marathi Movie
Banjara: सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला 'बंजारा'; १४,८०० फूट उंचीवर शूट करुन रचला नवा इतिहास

अभिनेता विराट मडके 'अवकारीका' चित्रपटात स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुम्बकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे, आदि कलाकार मंडळी दिसणार आहेत.

Avkarika Marathi Movie
Sikandar shows Cancelled: सलमान खानला मोठा झटका; ईदच्या दिवशीच 'सिकंदर'चे शो रद्द

या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते अरविंद भोसले यांची आहेत. छायांकन करण तांदळे तर संकलन अथर्व मुळे यांचे आहे. सहदिग्दर्शक रेहमान पठाण तर कार्यकारी निर्माता चेतन परदेशी आहेत. संगीत श्रेयस देशपांडे यांचे असून गायक कैलास खैर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com